Suryakumar Yadav : हार्दिक पंड्याला डावलून सूर्यकुमार यादवला का केलं कर्णधार?
Suryakumar Yadav Hardik Pandya : श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा होती. पण, भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची सोपवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादव कर्णधार असेल
बीसीसीआयच्या दोन दिवस चालेल्या बैठकीत काय झालं?
शुभमन गिलवर उप कर्णधार पदाची जबाबदारी
Suryakumar Yadav Indian Team Captain : टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा उप कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याला श्रीलंका दौऱ्यात कर्णधार बनवले जाईल, असे म्हटले जात होते. पण, त्याला उप कर्णधारही करण्यात आले नाही. रोहित शर्मानंतर कर्णधार पदासाठी सर्वात आघाडीवर हार्दिक पंड्याचे नाव होते, पण सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले. नेमके असे काय झाले की हार्दिक पंड्याच्या नावाचा विचार केला गेला नाही? (Why Suryakumar Yadav elected As Captain Instead of Hardik Pandya?)
ADVERTISEMENT
'आजतक'ने सूत्रांच्या हवाल्याने बीसीसीआयच्या बैठकीतील माहितीबद्दल वृत्त प्रसिद्ध केले आहे. श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार होण्यात तीन लोकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समजते, यात रोहित शर्मा, अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर.
बीसीसीआयची झाली बैठक
श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 आणि एकदिवसीय संघाची घोषणा १८ जुलै रोजी झाली. भारतीय संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची दोन दिवस बैठक झाली. बीसीसीआयमधील एका उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, दोन्ही दिवशी बैठक ऑनलाईन झाली. या बैठकीला रोहित शर्मा, निवड समितीचे मुख्य अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित होते.
हे वाचलं का?
हार्दिक पंड्याला कर्णधार न करण्याचे कारण काय?
सूत्रांनी सांगितले की, या बैठकीपूर्वी हे निश्चित होतं की, हार्दिक पंड्या टी२० संघाचा कर्णधार असेल. पण हार्दिक पंड्या एकदिवसीय सामन्यात खेळण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले. या मागे व्यक्तिगत कारण असल्याचे हार्दिकने सांगितले. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे दिली जाईल, हे ठरवण्यात आले.
हेही वाचा >> नताशा- हार्दिक पंड्याचा घटस्फोट, चार वर्षांचा संसार का मोडला?
सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यास रोहित शर्मा, अजित आगरकर सहमत होते. गौतम गंभीरला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यानेही सूर्यकुमारचेच नाव सूचवले. त्याचबरोबर खेळाडूंचा प्रतिसादही सूर्यकुमार यादवच्या बाजूनेच होता.
ADVERTISEMENT
शुभमन गिलला उप कर्णधार का केले?
एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास हार्दिक पंड्याने नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने भविष्याच्या दृष्टीने शुभमन गिलची उप कर्णधार म्हणून निवड केली आहे. यात एक महत्त्वाचे कारण त्याचे वय सुद्धा आहे.
ADVERTISEMENT
एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ३७ वर्षांचा आहे. नवीन टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ३३ वर्षांचा आहे. तर शुभमन गिल सध्या २४ वर्षांचाच आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून गिलला संधी मिळेल.
हेही वाचा >> रोहित वनडे आणि टेस्टमधून घेणार संन्यास? निवृत्तीवर सोडलं मौन
शुभमन गिल हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांना बाजूला सारून उप कर्णधार बनला आहे. याचे कारण म्हणजे पंत कार अपघातात जखमी झाला होता. त्याने आता संघात घरवापसी केली. दुसरीकडे पंड्याच्या फीटनेसबद्दलही प्रश्न उपस्थित होत असतात. अशात एक चांगला पर्याय म्हणून गिलच्या नावाला पसंती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT