Prithvi Shaw चा खेळ खल्लास! मुंबईच्या स्टार फलंदाजाला रणजी ट्रॉफीतून का वगळलं? धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Prithvi Shaw Dropped In Ranji Trophy
Prithvi Shaw Dropped In Ranji Trophy
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कमी वयात पृथ्वी शॉ ने केलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

point

पृथ्वी शॉ ला रणजी ट्रॉफीतून बाहेर काढण्याचं नेमकं कारण काय?

point

आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ने केलीय चमकदार कामगिरी

Why Prithvi Shaw Dropped In Ranji Trophy: कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप टाकणारा मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ ला मोठा दणका बसला आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वी शॉने हिंदूस्थानी संघातून आपलं स्थान गमावलं होतं. अशातच आता देशांर्तगत क्रिकेटमधूनही पृथ्व शॉ ला बाहेर काढलं आहे. कसोटी संघात जबरदस्त पदार्पण केल्यानंतर पृथ्वी शॉ ला त्यानंतरच्या सामन्यांमध्ये चकमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे टीम इंडियात शॉ चा संघर्ष वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सोमवारी घोषित केलेल्या 'भारत अ' संघात पृथ्वी शॉला जागा मिळाली नाही. या रेसमध्ये अभिमन्यु ईश्वरन आणि ऋतुराज गायकवाड यांनी भरारी घेतली आहे. तर मुंबईच्या रणजी ट्रॉफीतून बाहेर केल्याने पृथ्वीला मोठा धक्का बसला आहे. 26 ऑक्टोबरला त्रिपुरा विरोधात होणाऱ्या सामन्याआधीच पृथ्वीला संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. वजन खूप वाढल्याने पृथ्वीला संघातून बाहेर काढलं आहे. तसच पृथ्वी नेट प्रक्टिसला वेळेवर जात नसल्यानं त्याला संघातून वगळ्यात आल्याचंही समजते.

सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये अशी केली कामगिरी

आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने 19.66 च्या सरासरीनं 59 धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद 39 धावा हा त्याचा बेस्ट स्कोअर आहे. या हंगामात झालेल्या बडोदाविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉला धावांचा सूर गवसला नाही. तो 7,12 अशी धावसंख्या करून स्वस्तात माघारी परतला. महाराष्ट्राविरोधात झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने विजय मिळवला. यामध्ये शॉने पहिल्या इनिंगमध्ये 1, तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 39 धावा केल्या. परंतु, शॉच्या फिटनेसबाबत मुंबईच्या निवडकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Vidhan Sabha: ऐन मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचा आकडा ठरला!

मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिले 'हे' निर्देश

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MC) पृथ्वी शॉला राज्यस्तरीय संघातील ट्रेनर्सकडे दोन आठवड्यांचं ट्रेनिंग शेड्युल फिक्स करण्याचे निर्देश दिले आहेत. संघव्यवस्थापनाने एमसीएला माहिती दिली होती की, पृथ्वीच्या शरीरात 35 टक्के फॅट आहे आणि त्याला संघात घेण्याआधी मोठ्या ट्रेनिंगची गरज आहे. मुंबईच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं, पृथ्वीला संघातून ड्रॉप केलं आहे. संघात निवड होण्यासाठी त्याला ट्रेनिंग करून वजन कमी करण्याची आवश्यकता आहे. 

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशींवर घोंगावेल आर्थिक संकट ! तर काही राशींवर पडेल पैशांचा पाऊस

    follow whatsapp

    ADVERTISEMENT