Virat kohli : ‘तेव्हा तुझी सगळे मस्करी….’, ‘विराट’ कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर भारावला, ड्रेसिंग रूममधला सांगितला किस्सा?
विराट कोहलीने न्युझीलंड विरूद्धच्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यात कारकिर्दीतले 50 वे शतक झळकावले आहे. विराटने हे 50 वे शतक झळकावून क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा विक्रम देखील मोडला आहे.यानंतर आता सचिन तेडुलकरने या विराट शतकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
Virat Kohli 50th Odi Century, Odi World Cup : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) न्युझीलंड (New Zealand) विरूद्धच्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यात कारकिर्दीतले 50 वे शतक झळकावले आहे. विराटने हे 50 वे शतक झळकावून क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) याचा विक्रम देखील मोडला आहे.यानंतर आता सचिन तेडुलकरने या विराट शतकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (virat kohli 50th odi century sachin tendulkar first reaction india vs new zealand odi world cup 2023)
ADVERTISEMENT
क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने एक्स या सोशल माध्यमावर विराटच्या ऐतिहासिक 50 व्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा तुला मी पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा तु माझ्या पायाला स्पर्श केला होतास, म्हणून ड्रेसिंगरूममधल्या इतर सहकाऱ्यांनी तुझी थट्टा मस्करी केली. त्या दिवशी मला हसू आवरता आले नाही.पण लवकरच, तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा ‘विराट’ खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद आहे, असे सचिन म्हणाला.
मला यापेक्षा जास्त आनंद नाही होऊ शकत की एका भारतीयाने माझा विक्रम मोडला आणि तोही वर्ल्ड कप सेमी फायनलसारख्या मोठ्या मंचावर, असेही सचिनने म्हटले आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Advay Ahire : ठाकरे गटाच्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
सचिनचा रेकॉर्ड ब्रेक
वानखेडेवर रंगलेल्या सेमी फायनल सामन्यात विराटने कारकिर्दीतले 50 वे शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावे कारकिर्दीत 49 शतक होती. त्याचा हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंनी केला.मात्र अनेकांना त्याच्या या विक्रमाच्या जवळपासही पोहोचता आले नाही. विराट याला अपवाद ठरला होता. आणि आता वानखेडेच्याच मैदानावर विराट कोहलीने सचिनचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : … अन् मालकिणीने नोकराचा कापला प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
आतापर्यंत सर्वाधिक शतकाचा रेकॉर्ड सचिन तेंडूलकरच्या नावे होता. सचिनने वनडेत 49 शतक ठोकले होते. विराटने हा शतकाचा रेकॉर्ड मोडत 50 वे शतक ठोकले. हे शतक ठोकून विराट कोहली वनडेत 50 वे शतक पुर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. त्याच्या या कामगिरीचे आता क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT