WTC फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

wtc final india vs australia rohit sharma team india lost 5 reason
wtc final india vs australia rohit sharma team india lost 5 reason
social share
google news

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने लंडनच्या ओव्हल मैदानावर टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान टीम इंडियाने 2013 साली शेवटची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर साधारण 10 वर्षानंतर टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्माच्या नेृतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. मात्र या संधीची टीम इंडियाला सोने करता आले नाही,आणि त्यांचा पराभव झाला. दरम्यान आता WTC फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे जाणून घेऊय़ात. (wtc final india vs australia rohit sharma team india lost 5 reason)

ADVERTISEMENT

IPL नंतर आराम मिळाला नाही…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपुर्वी टीम इंडिया आयपीएलमध्ये व्यस्त होती. तब्बल दोन महिने चाललेल्या आयपीएलचा अंतिम सामना 29 मेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला गेला. या फायनलनंतर टीम इंडियाकडे प्रॅक्टीससाठी अवघा एकच आठवडा होता.त्यामुळे आयपीएल खेळल्यानंतर टीम इंडियाला विश्रांतीच गरज होती, मात्र थेट 5 दिवसाचा टेस्ट सामना खेळावा लागला. हे खेळाडूंसाठी खुपच अवघड गेले आणि याचा परिणाम टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर झाला.

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. खेळपट्टीवर भरपूर गवत आहे, अशावेळी वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असा रोहितचा अंदाज होता.मात्र रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियाने सुरूवातीला 76 धावात 3 विकेट गमावले. नंतर स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेडने चौथ्या विकेटसाठी 285 धावांची पार्टनरशिप केली होती. स्टीव स्मिथ 121 तर ट्रेविस हेडने 163 धावांची खेळी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डावा 469 धावांवर आटोपला. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीचा अचूक अंदाज बाधण्यात अपयशी ठरले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप

टीम इंडियाचे टॉप ऑर्डर सतत फ्लॉप कामगिरी करत आहेत, ही संघाची कमकुवत बाजू ठरली. ज्याच्याकड़ून सर्वाधिक अपेक्षा होती तो शुबमन गिल पहिल्या डावात 13 आणि दुसऱ्या डावात 18 धावा करू शकला. कर्णधार रोहित शर्मा (15,43) धावा करू शकला. विराट कोहलीने (14,49) धावा केल्या. चेतेश्वर पुजारा देखील या सामन्यात फ्लॉप ठरला. एकट्या अजिंक्य रहाणे या सामन्यात (89,46) अशी सर्वाधिक धावसंख्या केली. टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करत नसल्यानेच टीम इंडियाचा पराभव झाला.

टी-20 तून बाहेर पडलेच नाही

आयपीएल खेळून मैदानात उतरलेले टीम इंडियाचे खेळाडू टी20 फॉरमॅटमधून बाहेरच पडू शकले नाही. याच कारणामुळे वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपमध्ये ते टी20 सारखे चुकीचे शॉर्ट खेळून आऊट झाले. विशेष करून टॉप ऑर्डरचे फलंदाज चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे आऊट झाले.

ADVERTISEMENT

अनुभवी अश्विनला बाहेर बसवलं

कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या सामन्यात बाहेर बसवले, हा देखील टीम इंडियाचा पराभवाचे मुख्य कारण आहे. कर्णधार आणि प्रशिक्षकाने अश्विनला प्लेइंग-11 मध्ये संधी दिली नाही. त्यांचा हा निर्णय सुरुवातीपासूनच चर्चेत होता. सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. अश्विनला संधी दिली असती तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असेही बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 469, दुसरा डाव : 270/8 घोषित
टीम इंडियाचा पहिला डाव : 296, दुसरा डाव : 234

    follow whatsapp

    ADVERTISEMENT