Personal Finance Tips on New Tax Regime: मुंबई: 1 एप्रिलपासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. टीडीएस व्यतिरिक्त, 1 एप्रिलपासून आयकरात मोठा बदल होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या पगाराला आयकरातून सूट दिली आहे. यापेक्षा जास्त पगारावर आयकर स्लॅब लागू होतील. पूर्वी, जर आपण नवीन कर प्रणालीतील उत्पन्न कर स्लॅबबद्दल बोललो तर, 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 80 हजार रुपये कर भरावा लागत होता.
ADVERTISEMENT
पूर्वी 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर शून्य होता. 3 लाख 1 रुपये ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% आयकर, 7 लाख 1 रुपये ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% आयकर आणि 10 लाख 1 रुपये ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% आयकर भरावा लागणार होता. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा करण्यात आली, ज्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा>> Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!
आयकराशी संबंधित हा नियम 1 एप्रिलपासून लागू होईल. डीफॉल्टनुसार, प्रत्येकाचा आयकर नवीन पद्धतीत असेल. जर एखाद्याला जुन्या कर पद्धतीत ते करायचे असेल तर त्यांना निवड करावी लागेल.
पर्सनल फायनान्सच्या (Personal Finance) या सीरीजमध्ये, आम्ही तुम्हाला 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन आयकराबद्दल आणि त्याच्या संपूर्ण कॅलक्यूलेशनबद्दल सांगणार आहोत. आता, 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणत्याही आयकर कपातीशिवाय तुम्हाला पगार मिळेल. आता, त्यांना जुन्या कर प्रणालीत जावे लागणार नाही आणि उत्पन्न कर वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार नाहीत. ते त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार गुंतवणूक करू शकतील.
जुन्या कर प्रणालीतील आहेत हे Tax स्लॅब
जुन्या करप्रणालीत, अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर नाही. 2.5 ते 3 लाखांवर 5%, 3 ते 5 लाखांवर 5%, 5 ते 10 लाखांवर 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30% कर भरावा लागेल.
हे ही वाचा>> Personal Finance: FD करण्यापूर्वी या 9 गोष्टी ठेवा लक्षात, नाहीतर कमवण्याऐवजी पैसा गमवाल!
जुन्या कर प्रणालीमध्ये Tax वाचवण्याचे सोपे मार्ग
- जुन्या कर व्यवस्थेत आयकरात सूट मिळविण्यासाठी अनेक तरतुदी आहेत, ज्या योग्यरित्या वापरल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
- कलम 80 C– 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर (PPF, EPF, LIC, ELSS इ.) कर सूट.
- एचआरए (House Rent Allowance)– घरभाड्यावर कर सूट.
- कलम 80 C - आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर सूट.
- कलम 80CCD(1B) – राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये ₹50,000 पर्यंतची अतिरिक्त सूट.
- कलम 24 (B) – गृहकर्जाच्या व्याजावर ₹२ लाखांपर्यंत कर सूट.
- कलम 80 E – संपूर्ण कालावधीसाठी शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कर सूट.
- कलम 87 A – 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 12,500 रुपयांपर्यंत कर सूट.
- मानक वजावट (Standard Deduction) - पगारदार व्यक्तींसाठी 50,000 ची अतिरिक्त कर सूट.
आता हे फायदे नवीन कर प्रणालीच्या नवीन कर स्लॅबमध्ये उपलब्ध आहेत.
यामध्ये, 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी 7 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर नव्हता. येथे, कलम 87 A अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर 25,000 रुपयांची कर सूट उपलब्ध आहे आणि पगारदार व्यक्तींसाठी 75,000 रुपयांपर्यंतची मानक वजावट उपलब्ध आहे.
1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. पगारदार व्यक्तींसाठी, ही मर्यादा मानक कर कपातीसह 12 लाख 75 हजार रुपये करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त पगारावरील कराच्या कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत.
जुने विरुद्ध नवीन कर प्रणाली स्लॅब (Old vs New Tax Regime Slabs)
जुनी कर व्यवस्था (old tax regime) | नवी कर व्यवस्था (new tax regime) |
स्लॅब | टॅक्स | स्लॅब (1 फेब्रुवारी 2025 च्या आधी) | टॅक्स | स्लॅब नवा (1 फेब्रुवारी 2025 पासून) | टॅक्स |
अडीच लाखापर्यंत | 0 | 3 लाख रुपयांरपासून | 0 | 4 लाख रुपयांपर्यत | 0 |
अडीच लाक 1 रुपयांपासून ते 3 लाखांपर्यंत | 5% | 3 लाख 1 रुपयापासून 7 लाखांपर्यंत | 5% | 4 लाख 1 रुपये ते 8 लाखांपर्यंत | 5% |
3 लाख 1 रुपये ते 5 लाखांपर्यंत | 5% | 7 लाख 1 रुपयांपासून ते10 लाखांपर्यंत | 10% | 8 लाख 1 रुपये ते 12 लाखांपर्यंत | 10% |
7 लाख 1 रुपयांपासून ते 10 लाखांपर्यंत | 20% | 10 लाख 1 रुपयांपासून ते 12 लाखांपर्यंत | 15% | 12 लाख 1 रुपये ते 16 लाखांपर्यंत | 15% |
10 लाख रुपये आणि त्यापुढे | 30% | 12 लाख 1 रुपयांपासून ते 15 लाख | 20% | 16 लाख 1 रुपये ते 20 लाखांपर्यंत | 20% |
----- | --- | 15 लाख रुपये आणि त्यापुढे | 30% | 20 लाख 1 रुपये ते 24 लाखांपर्यंत | 25: |
----- | --- | ----- | ----- | 24 लाख 1 रुपये आणि त्यापुढे | 30% |
ADVERTISEMENT
