मुंबई: कार खरेदी करण्यापूर्वी अनेकदा लोक फक्त त्यांची आवड काय आहे याचाच केवळ विचार करतात. डाउन पेमेंट करून आणि EMI ठरवून आपण सगळं काही भविष्यावर ढकलून देतो. पण जेव्हा आपले मासिक बजेट बिघडू लागते, तेव्हा तीच गाडी आपल्याला त्रासदायक वाटू लागते. अशावेळी आपण जो निर्णय घेतलेला असतो तो कसा चुकीचा होता याचाच विचार करत बसतो. एवढंच नव्हे तर आपली कार विकण्याचा देखील विचार करतो.
ADVERTISEMENT
या सगळ्याचा त्रास जर आपल्याला नको असेल तर गाडी खरेदी करण्यापूर्वी काही एक फॉर्म्युला लागू केला तर बऱ्याच गोष्टी स्वच्छ आणि स्पष्ट होतील. एखादे चांगले डील मिळाल्यास तुमच्या मासिक बजेटवर अजिबात परिणाम होणार नाही. तसेच तुमच्या कारच्या देखभालीचा तुम्हाला त्रासही होणार नाही. एकंदरीत, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कारमध्ये फिरण्याचा आनंद मिळेल आणि वेळोवेळी तिची देखभाल करण्यास देखील आपण सक्षम असाल. जेव्हा तुम्हाला गाडी बदलायची असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कारची चांगली किंमतही मिळेल.
हे ही वाचा>> SIP गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा? जर तुम्ही या Tips केल्या फॉलो तर तुमचे पैसे बुडणार नाहीत, व्हाल श्रीमंत
सुनिताची ड्रीम कार अन्...
सुनिता देखील तिचा 'ड्रीम कार' खरेदी करण्याचा विचार करत आहे. सुनिताचा पगार दरमहा 80 हजार रुपये आहे. ती आतापर्यंत सार्वजनिक वाहतूक वापरत आहे. आता तिला गाडीने ऑफिसला जायचे आहे. याचा अर्थ असा की, सुनिताच्या गरजांमध्ये ऑफिसला जाणे, कुटुंबासह फिरणे आणि महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यांनी शहराबाहेर प्रवास करणे समाविष्ट आहे. आता प्रश्न असा आहे की, सुनिताने कोणती बजेट कार खरेदी करावी. पगारासह बजेट आणि कार देखभालीची गणना कशी करावी? याबाबत आम्ही आपल्याला आता काही फॉर्म्युला सांगत आहोत.
तुमच्या पगाराच्या प्रमाणात तुम्ही तुमच्या कारचे बजेट अशा प्रकारे ठरवू शकता.
50 टक्क्यांचा नियम
- तुम्ही तुमच्या वार्षिक पगाराच्या 50% रक्कम काढू शकता.
- तुम्ही या रकमेमध्ये कार खरेदी करू शकता.
- सुनिताचा वार्षिक पगार 80,000 × 12 = 9,60,000 रुपये आहे.
- 50% नियमानुसार, सुनिता तिच्या कारचे बजेट 4,80,000-5 लाखांच्या दरम्यान ठेवू शकतो.
हे ही वाचा>> तुमच्या पैशांचं होणार तरी काय? Mutual Fund मधून लोकं काढतायेत धडाधड पैसे
20/4/10 नियम
- गाडीचे बजेट ठरवल्यानंतर हा नियम लागू केला पाहिजे.
- हे डाउन पेमेंट, कर्जाचा कालावधी आणि इंधन/देखभाल खर्च ठरवण्यास मदत करते.
- नियमानुसार, सुनिताने तिच्या पगाराच्या जास्तीत जास्त 20% रक्कम डाउन पेमेंट म्हणून ठेवावी.
- EMI जास्तीत जास्त 4 वर्षांसाठी ठेवावा.
- पगाराच्या 10 टक्के रक्कम इंधन आणि कारच्या देखभालीवर खर्च करावी.
- सुनिताने 1 लाख रुपये डाउन पेमेंट करावे.
- 4 वर्षांसाठी EMI 10% व्याज): दरमहा सुमारे 10,200.
- मासिक देखभाल आणि पेट्रोल: 6,000 ते 8,000 असावे.
नवीन गाडी घ्यावी की सेकंड हँड गाडी?
आता प्रश्न असा आहे की, गाडी नवीन घ्यावी की सेकंड हँड? जर तुम्हाला गाडी ताबडतोब बदलण्याची गरज नसेल आणि जर तुम्हाला कमीत कमी 10-12 वर्षे गाडी चालवायची असेल तर तुम्ही नवीन गाडी घ्यावी. कारण नवीन कारची किंमत 5 वर्षांत 50% ने घसरते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 5-6 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत कार बदलण्याचा विचार करत असाल तर जुनी कार खरेदी करणे चांगले. यामध्ये पुनर्विक्री मूल्यावरील तोटा कमी असतो.
पेट्रोल Vs डिझेल Vs CNG Vs इलेक्ट्रिक
- CNG: स्वस्त इंधन, पण कामगिरी खराब
- इलेक्ट्रिक: कमी ऑपरेटिंग खर्च, पण सुरुवातीची किंमत जास्त
- पेट्रोल: सुरुवातीला कमी खर्च, पण दीर्घकाळात महाग.
- डिझेल: पेट्रोलपेक्षा महाग पण सुरुवातीची खर्च कमी आहे आणि पुनर्विक्री मूल्य आणखी कमी आहे.
सुनिताने प्रथम ठरवावे की, ती दररोज किती गाडी वापरते. जर तिचा वापर जास्त असेल तर तिने CNG किंवा EVचा पर्याय निवडला पाहिजे. जर तिचा वापर आणि बजेट दोन्ही कमी असेल आणि तिला गाडीची चांगली पुनर्विक्री किंमत हवी असेल तर तिने पेट्रोलचा पर्याय निवडला पाहिजे. ती सुमारे 5 लाख रुपयांपर्यंतची गाडी खरेदी करू शकते. डाउन पेमेंट 1 लाख रुपये आणि 4 लाख रुपयांच्या कर्जावर EMI असेल. किंवा ती 5 लाख रुपयांपर्यंतची चांगली सेकंड हँड कार खरेदी करू शकते. यामध्ये तिला अधिक फिचर्स मिळतील.
ADVERTISEMENT
