डेअरीमध्ये भीषण स्फोट अन् आगीचे तांडव; तब्बल 18 हजार गायींचा होरपळून मृत्यू

मुंबई तक

• 11:52 AM • 14 Apr 2023

अमेरिकेतील टेक्सासमधील एका डेअरी फार्ममध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल 18,000 गायींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Around 18,000 cows died tragically due to explosion and arson at a dairy farm in Texas, USA

Around 18,000 cows died tragically due to explosion and arson at a dairy farm in Texas, USA

follow google news

अमेरिकेतील टेक्सासमधील एका डेअरी फार्ममध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल 18,000 गायींचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या आगीने नंतर इतकी भीषण झाली की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एक जण भाजला असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Around 18,000 cows died tragically due to explosion and arson at a dairy farm in Texas, USA)

हे वाचलं का?

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये सोमवारी हा स्फोट झाला. स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टेक्सासचे अग्निशमन अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.

विषारी सापांची झुंड अन् एकटा तरूण.. ‘हा’ Video तुम्हीही बघू शकणार नाही!

घटनास्थळावरील माहितानुसार, आग लागली तेव्हा गायींची दुधाची वेळ झाली होती. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. यातूनच जवळपास 90 टक्के (सुमारे 18 हजार) गाईंचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या बहुतेक गायी होल्स्टीन आणि जर्सी गायींचे मिश्रण होत्या. एका गायीची किंमत अंदाजे 2000 डॉलर (दीड लाख रुपयांपेक्षा जास्त) असल्याचं सांगण्यात आहे. एक-एक मृत जनावराचा देह बाहेर काढताना स्थानिकांचे डोळे पाणावले होते.

Pune Loksabha : काँग्रेसच्या जागेवरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’; पुण्यात नवं राजकारण

अपघाताबाबत डिमिटचे महापौर रॉजर मॅलोन म्हणाले- ‘असा अपघात इथे याआधी कधी झाला असेल, हे मला आठवत नाही. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या घटनेबाबत स्थानिक लोकांचे म्हणणं आहे की त्यांनी मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर काही वेळातच धुराचे लोट उठताना दिसले.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. डेअरी फार्मचा एक कर्मचारी आतमध्ये अडकला होता, त्याला खूप प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. मात्र, तो गंभीर भाजला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    follow whatsapp