Akshay Shinde : 'सोमवारपर्यंत जागा शोधा...', दफनविधीबाबत कोर्टाने कुणाला दिले आदेश?

विद्या

27 Sep 2024 (अपडेटेड: 27 Sep 2024, 04:33 PM)

Akshay Shinde encounter Case : अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. स्थानिक संस्थेचे सीईओ त्यांच्या मुलाच्या दफनविधीसाठी जमीन देत नाही, असे अक्षयच्या वडिलांनी याचिकेत म्हटले होते.

akshay shinde encounter case bombay high court order burial ritual badlapur rape case

अक्षय शिंदेच्या दफनविधीबाबतच्या सुनावणीत काय काय घडलं?

follow google news

बातम्या हायलाइट

point

आम्ही दफनविधीसाठी जागा शोधत आहोत

point

सोमवारपर्यंत जागा शोधा

point

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Akshay Shinde encounter Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या दफनविधीला विरोध होत आहे.  या प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत सरकारने आम्ही दफनविधीसाठी जागा शोधत असल्याची माहिती दिली आहे. यावर कोर्टाने सोमवार पर्यंत जागा शोधा,असे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. (akshay shinde encounter case bombay high court order burial ritual badlapur rape case)

हे वाचलं का?

अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. स्थानिक संस्थेचे सीईओ त्यांच्या मुलाच्या दफनविधीसाठी जमीन देत नाही, असे अक्षयच्या वडिलांनी याचिकेत म्हटले होते. तसेच अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी तीन शहरामध्ये दफनविधीस विरोध होत असल्याची माहिती कोर्टात दिली होती. या प्रकरणी न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे आणि मिलिंड साठे यांच्या खंडपीठासमोर आज सूनावणी पार पडलीय.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 4500 खात्यात आलेच नाही...आता पुढे काय करायचं?

या सुनावणीत मृतदेह दफन करण्यासाठी आम्ही जागा शोधत आहोत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने कोर्टात देण्यात आली.तर कोर्टाने यावर सरकारला सोमवारपर्यंत जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुटुंबियांच्या संरक्षणासाठी एक अधिकारीही नेमण्यास सांगितले आहे.  

आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांना अद्याप जागा मिळू शकली नाही. अनेक ठिकाणी त्यांना जागा देण्यासाठीही विरोध करण्यात आला आहे. आता पोलिसांच्या वतीने त्यांच्या दफनविधीसाठी जागा शोधली जात आहे. तसेच अक्षयच्या कुटुंबियांनी गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सूरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. 

    follow whatsapp