Ganesh Visarjan Muhurta 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच 07 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होणार आहे. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल. यालाच अनंत चतुर्थी असंही म्हणतात. चला मग बाप्पाच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घेऊयात. (Anant Chaturthi ganesh visarjan 2024 visarjan date correct muhurata)
ADVERTISEMENT
हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्तव आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्थीलाही आहे. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं विसर्जन 17 सप्टेंबर रोजी आहे.
हेही वाचा : Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमसोबत आमदार पती वागला गुलीगत; म्हणाल्या त्याने…
अनंत चतुर्दशी तिथी, पूजा शुभ मुहूर्त
अनंत चतुर्दशीचा प्रारंभ 16 सप्टेंबर 2024 दुपारी 03 वाजून 10 मिनिटांनी होईल. तर, 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल. अनंत चतुर्दशीला पूजा मुहूर्त सकाळी 06:07 ते 11:44 पर्यंत आहे.
गणपती विसर्जन मुहूर्त
-
सकाळचा मुहूर्त- सकाळी 09 वाडू 11 मिनिटे ते दुपारी 01 वाजून 47 मिनिटांपर्यंत
-
दुपारचा मुहूर्त- दुपारी 03 वाजून 19 मिनिटे ते 04 वाजून 51 मिनिटांपर्यंत
- संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटे ते रात्री 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत
- रात्रीचा मुहूर्त- रात्री 10 वाजून 47 मिनिटे ते 18 सप्टेंबर रोजी पहाटे 03 वाजून 12 मिनिटांपर्यंत
हेही वाचा : Baramati News : लाडक्या बहिणी साड्या न घेताच निघून गेल्या! युगेंद्र पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, काय घडलं?
श्री गणेश विसर्जन मंत्र 1
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
श्री गणेश विसर्जन मंत्र 2
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
ADVERTISEMENT