Anju Pakistan : “चार दिवसांपूर्वी तिने मला सांगितले की ती सहलीला जात आहे. मी विचारले असता ती म्हणाली की ती जयपूरला जात आहे. अंजू इथे एका खासगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते. मी पण खासगी नोकरी करतो”, हे विधान दुसरं तिसरं कुणाचं नाही, तर प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचा नवरा अरविंद यांचं. अंजू पती आणि मुलांना सोडून व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली आहे.
ADVERTISEMENT
अंजू राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे तिच्या कुटुंबासह राहत होती. जयपूरला जाण्याच्या बहाण्याने निघून गेलेली पत्नी अंजू आता पाकिस्तानातील लाहोरमध्ये असल्याची माहिती पती अरविंदला रविवारी मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून अंजूची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
वाचा >> पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या
अरविंदने यांचं म्हणणं आहे की, अंजू चार दिवसांपूर्वी फिरायला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. मी विचारल्यावर अंजू म्हणाली की ती जयपूरला जात आहे, काही दिवसांत परत येईल. अरविंद यांच्या म्हणण्यानुसार, अंजूही व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे सतत त्यांच्या संपर्कात असते. रविवारीही त्यांनी माझ्याशी व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे संवाद साधला. मग तिने मला सांगितले की ती पाकिस्तानातील लाहोरमध्ये आहे आणि 2-3 दिवसात परत येईल.
वाचा >> Exclusive: सीमा हैदरचे तपास यंत्रणांनाच आव्हान, म्हणाली, ‘DNA,नार्को टेस्ट…’
अरविंद म्हणाले, पत्नी अंजू ही भिवडीतील एका खासगी कंपनीत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते. मी पण खाजगी नोकरी करतो. मी 2005 पासून भिवडी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्या दोघांना 2 मुले आहेत.
अंजू ही मूळची उत्तर प्रदेशची
सध्या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे पती आणि मुलांसह राहणारी अंजू ही मूळची उत्तर प्रदेशातील कालोर (जिल्हा जालौन) येथील आहे. तिचा प्रियकर नसरुल्लाह पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे राहतो आणि तो वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) आहे.
अंजू 90 दिवसांच्या व्हिसावर गेली पाकिस्तानला
हे प्रकरण समोर आल्यानंतर अंजूचा भारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या व्हिसाचा तपशीलही समोर आला आहे. अंजूच्या भेटीसाठी पाकिस्तानने 4 मे रोजी व्हिसा जारी केला होता. व्हिसाची वैधता 90 दिवसांची आहे. वाघा सीमेवरून ती पाकिस्तानात दाखल झाली.
माझं नसरुल्लाहवर प्रेम -अंजू
भारतीय महिला अंजूने सांगितले की, ती पाकिस्तानच्या नसरुल्लाहच्या प्रेमात आहे आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही. दोघांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.
काय म्हणाले अंजूचे पती अरविंद…
अंजू पुन्हा घरी येईल अशी आशा अरविंद यांना आहे. अरविंद यांचं म्हणणं आहे की, अंजूच्या कोणत्याही प्रियकराबद्दल मला कोणतीही माहिती नाही. ती मला दोन-तीन दिवसांत भारतात परत येईल, असं म्हणाली आहे. मला आशा आहे की ती भारतात येईल.
सीमा भारतात आली, अंजू पाकिस्तानात पोहोचली
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा देशात सुरू आहे. कारण ती आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे. मात्र, ती बेकायदेशीरपणे भारतात आली आहे. ती ग्रेटर नोएडामध्ये राहणारा तिचा प्रियकर सचिन मीनासोबत राहत आहे. सुरक्षा यंत्रणांनी सीमा आणि सचिनची चौकशी केली आहे.
सीमा हैदर आणि अंजू यांची कथाही अशीच आहे. प्रेमात पडून दोघांनीही आपल्या देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. दोघींमध्ये फरक एवढाच आहे की, सीमा बेकायदेशीरपणे देशात घुसलीये आणि अंजू तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहोचली.
ADVERTISEMENT