Crime : डोक्यात हातोडा घालून पतीने केली इंजीनियर पत्नीची निर्घृण हत्या! धक्कादायक कारण आलं समोर

Noida Crime News : नोएडाच्या फेज-1 मधील सेक्टर 15 मध्ये शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.  एका सॉफ्टवेअर इंजीनियर महिलेची तिच्या पतीने निर्घृण हत्या केली.

Engineer Woman Murder Case Update

Engineer Woman Murder Case Update

मुंबई तक

05 Apr 2025 (अपडेटेड: 05 Apr 2025, 11:24 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीने इंजीनियर पत्नीची का केली हत्या?

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Noida Crime News : नोएडाच्या फेज-1 मधील सेक्टर 15 मध्ये शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.  एका सॉफ्टवेअर इंजीनियर महिलेची तिच्या पतीने निर्घृण हत्या केली. डोक्यात हातोड्याने वार करत पतीने पत्नीला ठार केलं. आसमा खान (42) असं मृत महिलेचं नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. याच कारणामुळे पती नुरल्लाह हैदरने पत्नी आसमाची हत्या केली. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नुरल्लाह हैदर (55) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डीसीपी रामबदन सिंग यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना म्हटलं, मृत महिलेच्या मुलाने या गंभीर घटनेची माहिती 112 ला फोन करून पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट त्या ठिकाणी पोहोचले आणि तपास सुरु केला. आसमा खान असं मृत महिलेचं नाव आहे. तर नुरल्लाह हैदर असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला त्याच्या पत्नीवर संशय होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

हे ही वाचा >> 5th April Gold Rate : वीकेंडला ग्राहकांची मज्जाच मज्जा! सोन्या-चांदीचे भाव गडगडले, मुंबईसह 'या' शहरांतील भाव वाचाच

आरोपीने तपासादरम्यान सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय होता. म्हणून त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. या घटनेचा कसून तपास सुरु आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी म्हटलंय की, आसमाच्या मुलीने तिच्या आई-वडिलांमध्ये काही दिवसांपासून वादविवाद सुरु असल्याचं सांगितलं होतं. पण हे प्रकरण इतकं गंभीर स्वरुप धारण करेल, याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आसमाच्या डोक्यात हातोडा टाकून तिची हत्या करण्यात आली. 

चारित्र्याच्या संशयावरून पतीने इंजीनियर पत्नीची हत्या केल्यानं नोएडा परिसरात खळबळ माजली आहे. डोक्यात हातोडा घालून पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या पतीचा निषेध व्यक्त करत लोकांमध्ये संतापाची लाट परसली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. 

हे ही वाचा >> Badlapur Rape Case : बदलापूर पुन्हा हादरलं! कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

    follow whatsapp