Pune : भाजप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर निखिल वागळे संतापले, पाहा नेमकं काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

• 10:44 PM • 09 Feb 2024

पुण्यात आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शाईफेक आणि हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर देखील निखिल वागळे कार्यक्रमाला पोहोचलेच आणि त्यांचा कार्यक्रम पार पडला होता.

पुण्यात आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शाईफेक आणि हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर देखील निखिल वागळे कार्यक्रमाला पोहोचलेच आणि त्यांचा कार्यक्रम पार पडला होता.

attack on senior journalist nikhil wagle car and threw ink pune news

follow google news

पुण्यात आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शाईफेक आणि हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर देखील निखिल वागळे कार्यक्रमाला पोहोचलेच आणि त्यांचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी उपस्थितांना संबोधित करून सरकारवर जोरदार हल्ला केला होता. नेमकं ते काय म्हणालेत? हे जाणून घेऊयात.    (attack on senior journalist nikhil wagle car and threw ink pune news) 

हे वाचलं का?

पुण्यात आज (9 फेब्रुवारी) राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने 'निर्भय बनो' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी पुण्यातील काही भाजप नेत्यांनी दिली होती. त्याप्रमाणेच आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर ही निखिल वागळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

निखिल वागळे काय म्हणाले? 

''काँग्रेसवर कितीही टीका केली तरी ते आमचा खून करत नव्हते , शरद पवारांवर मी कितीही टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही.त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली आहे, निखिल वागळेला जिवंतपणे मुंबईत जाऊ देणार नाही. मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल. पण एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील''.  

''ही साधीसुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्याही पक्षात नाही. आणि गावागावात जाऊन आम्ही सांगतो आहोत महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली तर त्यांना जोडे मारू. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहेत. हे गँगस्टर आहेत, हे फँसिस्ट आहेत.'' 

''पुणे पोलिसांना आधीच माहिती होते. कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितले होते की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका घेतली.अख्ख पोलीस दल भाजपने विकत घेतलं आहे. जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काहीही नैतिकता राहत नाही.'' 

वागळेंच्या गाडीवर हल्ला 

दरम्यान, पुण्यात आज दुपारपासून निखिल वागळेंवर भाजपने जोरदार आंदोलन सुरू होतं. मात्र, संध्याकाळी कार्यक्रमस्थळी निखिल वागळे यांची कार येताच भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी वागळेंच्या कारवर जोरदार हल्ला केला. एवढंच नव्हे तर शाईफेक देखील करण्यात आली. पुण्यात शास्त्री रोडवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते हे प्रचंड  आक्रमक झाले. त्यामुळे जेव्हा वागळेंची गाडी ही दांडेकर पूल चौकामध्ये आली तेव्हा अचानक निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. 

    follow whatsapp