कामाची बातमी: तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय, चुटकीसरशी बुक होईल तुमचं तिकीट

तात्काळ तिकीट बुक करणं ही अगदी पटकन म्हणजेच काही सेकंदात होणारी प्रक्रिया आहे. अशात, आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही बुक केलेलं तात्काळ तिकीट कन्फर्म होऊ शकतं.

तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय

तात्काळ तिकीट बुक करण्याचे रामबाण उपाय

मुंबई तक

• 10:00 AM • 15 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ट्रेनचं तात्काळ तिकीट पटकन बुक होण्यासाठी टिप्स

point

ट्रेनचं तात्काळ तिकीट लवकर बुक होण्यासाठी काय करावे?

point

तात्काळ तिकीट बुक करताना मास्टर लिस्टचा वापर

Trick to book Tatkal Ticket: अचानक, ट्रेनने जाण्याचा प्लॅन ठरल्यानंतर तात्काळ तिकीट बुक करणे हा त्यावेळी उत्तम पर्याय असतो. सध्या, ट्रेनच्या प्रवासासाठी तात्काळ तिकीट बुक करणं, ही अगदीच सामान्य बाब बनली आहे. खरंतर, तात्काळ तिकीट बुक करणं ही अगदी पटकन म्हणजेच काही सेकंदात होणारी प्रक्रिया आहे. अशात, आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही बुक केलेलं तात्काळ तिकीट कन्फर्म होऊ शकतं. सामान्यत: तिकीट बुक करतेवेळी तुम्हाला वेळोवेळी नाव, वय, आयडी अशा बऱ्याच डिटेल्स भराव्या लागतात. यामध्ये खुप वेळ जातो, ज्यामुळे तुमचं तिकीट हातातून निघून जातं. अशात, नेमकं काय करावं? याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तात्काळ तिकीट लवकर बुक होण्यासाठी IRCTC ची मास्टर लिस्ट अगदी चांगला पर्याय ठरु शकतो. ही एक अशी सुविधा आहे, ज्यामध्ये फास्ट ट्रॅकवर तुमच्या तात्काळ तिकीटाचं बुकींग होतं. 

हे वाचलं का?

मास्टर लिस्ट म्हणजे काय?

ट्रेनचं तात्काळ बुकींगमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अशाप्रकारे तिकीट बुक करणं गेम चेंजर ठरु शकतं. IRCTC ची मास्टर लिस्ट एक अशी सुविधा आहे ज्यात तुम्ही स्वत:चे, कुटुंबातील व्यक्तींचे किंवा तुमच्या मित्रपरिवारापैकी कोणाचेही डिटेल्स (नाव, वय, लिंग किंवा आयडी) आधीच सेव्ह करुन ठेवू शकता. तिकीट बुक करायचे असल्यास, फक्त एका क्लिकवर सगळे डिटेल्स आपोआप भरतील. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि बुकींगची प्रक्रिया लवकर होते.

हे ही वाचा: सलमानला पुन्हा धमकी! 'कार बॉम्बने उडवू', व्हॉट्सॲपला आलेल्या मॅसेजमध्ये काय म्हटलंय?

तात्काळ तिकीटमध्ये मास्टर लिस्टचा काय फायदा?

1. जलद बुकिंग: प्रवाशांचे तपशील टाइप करण्यात आता वेळ लागणार नाही.
2. टायपिंग चुकांचा धोका कमी: वारंवार टायपिंगमुळे होणाऱ्या चुका टाळतात.
3. कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता: या पद्धतीचा वापर करुन तुमचे तिकीट लवकर बुक होऊ शकते, कारण तुम्ही इतरांपूर्वी तुमचे बुकिंग पूर्ण करू शकता.
4. बऱ्याच तिकीटांच्या बुकिंगची सोय: तुम्ही वारंवार प्रवास करत असलेल्या लोकांचा डेटा नेहमीच तयार असतो.

हे ही वाचा: कामाची बातमी: PNR स्टेटस आणि तिकीट कन्फर्मेशन कुठे आणि कसं चेक करायचं? ‘या’ टिप्स करा फॉलो

मास्टर लिस्ट कसं तयार करावं?

  • (https://www.irctc.co.in) या IRCTC च्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अॅपवरुन लॉगिन करा.
  • त्यानंतर 'My Profile' मध्ये जा. 
  • तिथे गेल्यानंतर 'Add/Modify Master List' चा पर्याय निवडा. 
  • 'Add Passenger' वर क्लिक करुन त्यात नाव, वय, लिंग, आयडी यासारख्या डिटेल्स भरुन घ्या. 
  • डिटेल्स भरुन झाल्यानंतर 'Save' वर क्लिक करा.

तिकीट बुक करताना मास्टर लिस्टचा वापर कसा करावा? 

  • तिकीट बुक करण्यासाठी लॉगिन केल्यानंतर ट्रेन आणि प्रवासाची तारीख निवडा. 
  • यानंतर, प्रवाशांची माहिती भरण्यासाठी फॉर्म येईल. तिथे 'Select from Master List' हा पर्याय दिसेल. 
  • तिथे गेल्यानंतर सेव्ह केलेल्या प्रवाशाची माहिती तुम्ही निवडू शकता. 
  • काही सेकंदातच तुमच्या सर्व डिटेल्स फॉर्ममध्ये भरुन जातील. यासाठी फॉर्ममध्ये कुठेही टायपिंग करण्याची आवश्यकता भासणार नाही. 

मास्टर लिस्ट व्यतिरिक्त, तात्काळ तिकीट बुकींगच्या प्रक्रियेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

  • IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवर लॉग इन करा. खूप लवकर लॉग इन केल्याने सिस्टम तुम्हाला लॉग आउट करू शकते.
  • जलद इंटरनेट वापरा: तत्काळ बुकिंग दरम्यान, स्लो इंटरनेटमुळे तुमचे तिकीट चुकू शकते. हाय-स्पीड नेटवर्क वापरा.
  • पेमेंट पर्याय तयार ठेवा: पेमेंट करताना अधिक वेळ न लागण्यासाठी UPI, नेट बँकिंग किंवा IRCTC ई-वॉलेटमध्ये पैश्यांचं बॅलेन्स ठेवा.
  • ट्रेन आधीच सर्च करुन ठेवा: बुकिंगच्या वेळेपूर्वी ट्रेन नंबर आणि रूट शोधा जेणेकरून तुम्ही बुकिंगच्या वेळी थेट 'तत्काळ' पर्याय निवडू शकाल.

 

    follow whatsapp