"त्यांना मारणार..", लॉरेन्स बिष्णोईची सोशल मीडिया पोस्ट पुन्हा व्हायरल! कोण आहेत टार्गेटवर?

Lawrence Bishnoi Viral Post : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या रडारवर असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Lawrence Bishnoi Latest News Update

Lawrence Bishnoi Latest News Update

मुंबई तक

• 08:21 AM • 15 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आम्ही दोघांनाही मारणार, लॉरेन्स बिष्णोईने कोणाला केलंय टार्गेट?

point

बिष्णोई गँगच्या व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय?

point

 लॉरेन्सने पोस्ट शेअर का केली?

Lawrence Bishnoi Viral Post : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आरोपी असलेला आणि अभिनेता सलमान खानला जीवे धमकी देणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण बिष्णोई गँगने पुन्हा एकदा धमकीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जीशान अख्तर आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी काहीही संबंध नाही. त्या दोघांनाही मारणार, असं व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

आम्ही दोघांनाही मारणार - लॉरेन्स बिष्णोई

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या एका व्हायरल पोस्टने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या पोस्टमध्ये लॉरेन्सने दावा केला आहे की, त्यांचा जीशान अख्तर आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी काहीही संबंध नाही. माझी गँग आणि माझे लोक या व्यक्तींपासून सतर्क राहावे. कोणीही त्यांना संपर्क करू नका. आम्ही दोघांनाही मारणार आहोत.

हे ही वाचा >> महाराष्ट्रातील आजचे हवामान, 15 Apr 2025: पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार, मुंबईत मात्र...

व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय?

लॉरेन बिष्णोईद्वारा व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की, जीशान अख्तर आणि शहजाद भट्टी दोघेही मिळून देशविरोधी कारवाया करत आहेत. त्या दोघांनाही आम्ही मारणार आहोत. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. हे लोक माझ्या नावाचा दुरुपयोग करत आहेत.

हे ही वाचा >> Astro: 7 उपाय करा पती-पत्नीमध्ये भांडणं होणारच नाही, या टिप्स आहेत खूप कामाच्या!

 लॉरेन्सने पोस्ट शेअर का केली?

पंजाबच्या जालंधरमध्ये भाजप नेता मनोरंजन कालियाच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात आरोपी म्हणून जीशान अख्तर आणि शहजाद भट्टी यांची नावं समोर आली आहेत. पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे की, जीशान अख्तरचा संबंध लॉरेन्स बिष्णोई गँगशी आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जीशान अख्तर असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईसह जीशान अख्तरचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. 

    follow whatsapp