Beed News : बीड जिल्ह्यात (Beed District) राहणारे ललितकुमार साळवे जन्मानंतर 20 वर्ष स्त्री म्हणून जगले. लिंग बदलून ते ललितकुमार झाले. त्यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी सीमा नावाच्या मुलीशी लग्न केले. सीमाचे कुटुंब तयार नव्हते तरीही सीमाने आपला निर्णय बदलला नाही आणि ललितशी लग्न केले. आता ललित आणि सीमा आई-वडील झाले आहेत. (Beed News Police Constable Lalit Kumar Who Lived 20 years as a Women After gender Changed he become Father)
ADVERTISEMENT
आपल्या आयुष्याची गोष्ट सांगताना ललित म्हणाला, ‘माझ्या मनात खूप चलबिचल असायची. पूर्वी मी शारीरिकदृष्ट्या एक स्त्री होतो, पण माझ्या भावना पुरुषांसारख्या होत्या. यानंतर मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून मी पुरूष झालो. यानंतर पोलीस दलात रुजू झालो.’
वाचा : Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’
पोलीस ठाण्यात पोस्टिंगही मिळाली. ललित यांनी पुढे सांगितले की, ‘यानंतर माझी मैत्री माझ्या पत्नीशी झाली. आम्हा दोघांना लग्न करायचे होते, पण तिचे कुटुंबीय तयार नव्हते. पण अखेर आमचं लग्न झालं. ज्या मुलीने सर्व विरोधाला न जुमानता माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, तिला आई व्हायचं होतं.’
‘लोक आम्हाला विचारायचे, तुम्ही गुड न्यूज कधी देणार? लग्नानंतर पहिली दोन वर्षे कोणी काहीच बोलले नाही, पण नंतर चर्चा सुरू झाल्या. बरेच लोक विचारायचे की आता लग्न झाले आहे, मुलांचा विचार करा, गुड न्यूज कधी देणार. त्यामुळे माझे मन थोडे अस्वस्थ झाले. पण आता आता माझी पत्नी सीमा हिने मकर संक्रांतीच्या दिवशी (15 जानेवारी) सकाळी 10:21 वाजता एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे. माझ्या घरात आनंदाचे वातावरण आहे.’
वाचा : ‘लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो…’, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
ललित कुमार यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनात एक स्त्री म्हणून जीवन जगले. लिंग बदलानंतर पहिल्यांदाच वडील झालेले बीड जिल्हा पोलीस दलातील कॉन्स्टेबल ललितकुमार साळवे यांनी सांगितले की, ‘मी आता बाप झालो आहे. माझे आई-वडीलही खूप आनंदी आहेत.’
वाचा : ‘BJP म्हणजे भेकड जनता पार्टी’, ठाकरेंचा केंद्रावर घणाघात
तसंच याबाबत आनंद व्यक्त करत ललित सावळे पुढे म्हणाले, ‘महिला ते पुरुष हा प्रवास खून संघर्षमय राहिला आहे. या काळात मला अनेकांनी मानसिक आधार दिला. एवढंच नाहीत तर सहकार्य देखील केले. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यावर वर्षभरात मी लग्न केले. आम्हाला बाळ व्हावे अशी आमच्या दोघांची इच्छा होती. आता आमची ही इच्छा देखील पूर्ण झाली आहे.’
ADVERTISEMENT