भगवद्गीता आणि मनाचे श्लोक... शाळेतील अभ्यासक्रमात नेमकं काय-काय?

मुंबई तक

• 03:53 PM • 27 May 2024

'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर करताना त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीता यांचा अभ्यासात समावेश करण्याचे नमूद केले आहे.

शाळेतील अभ्यासक्रमात नेमकं काय-काय?  (प्रातिनिधिक फोटो)

शाळेतील अभ्यासक्रमात नेमकं काय-काय? (प्रातिनिधिक फोटो)

follow google news

मुंबई: महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत  (Maharashtra Education School Syllabus) एक महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर यावर बरीच टीका सुरू आहे.  एससीईआरटीने (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) ने सुचवलेल्या अभ्यासक्रमावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा हा जाहीर केल्यानंतर आता त्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात या विषयात समावेश करण्यात येणार आहे. (bhagavad gita and manache shlok what exactly is in the school curriculum)

हे वाचलं का?

एससीईआरटीने दिलेल्या आराखड्यात नेमकं काय म्हटलंय?

भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान या विषयांमध्ये करण्यात यावा. असे एससीईआरटीने आपल्या आराखड्यामध्ये नमूद केलं आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश आहे. असं आराखड्यात म्हटलं आहे. याबाबत सरकारने काही आक्षेप आणि सूचना देखील मागविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक पाठ करण्याची सूचना या आराखड्यात आहे.

भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, असं SCERT ने आरखाड्यामध्ये नमूद केलं आहे. तसेच तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असंही त्यात नमूद केलेलं आहे.

मराठी भाषा अनिवार्य

मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात अद्यापही त्याबाबत त्याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही.

    follow whatsapp