MP Bjp-Congress: भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवर तुफान दगडफेक, वाहनांचे नुकसान

मुंबई तक

06 Sep 2023 (अपडेटेड: 06 Sep 2023, 02:45 PM)

Jan Ashirwad : भाजपची जन आशिर्वाद यात्रा मध्य प्रदेशात सुरु आहे. काल त्या यात्रेवर तुफान दगडफेक झाली. त्यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यावरुन आता राजकारण तापले आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

BJP Janwadi Yatra madhya pradesh stone throwing

BJP Janwadi Yatra madhya pradesh stone throwing

follow google news

Jan Ashirwad : मध्य प्रदेशमधील नीमचमध्ये भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवर (Janwadi Ashirwad Yatra) हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 5 सप्टेंबर रोजी ही आशिर्वाद यात्रा मंदसौरला पोहचणार होती. त्यावेळी अचानक यात्रेवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत काही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जन आशिर्वाद यात्रेत सहभागी असलेल्या नेत्यांनी आमच्या या यात्रेवर काँग्रेसने (Congress) जाणीवपूर्वक दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. मात्र या दगडफेकीमध्ये कोणी जखमी झाले आहेत का त्याची अजून माहिती मिळाली नाही.

हे वाचलं का?

काँग्रेसची लोकं झाडामागे

इंडिया टुडेच्या आकाश चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार नीमचमधील रामपुरा परिसरातील राऊली कुंडी या गावामध्ये ही घटना घडली आहे. ही घटना 5 रोजी रात्री आठ वाजता घडली असून भाजपच्या यात्रेत सहभागी असलेल्या लोकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी काँग्रेसवर आरोप करत काँग्रेसची काही लोकं झाडामागे लपून बसले होते. त्यांनीच आमच्या यात्रेवर दगडफेक केली असल्याचे सांगत त्यांनी त्याबाबत एक ट्विट केले आहे. त्याममध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि लोक समर्थनाला घाबरुनच काँग्रेसने आशिर्वाद यात्रेवर हल्ला केला आहे. वाहनांचीही तोडफोड केली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. मात्र ज्या काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या यात्रेवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संधीसाधू यात्रेविरोधात संताप

भाजपने यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपला उत्तर दिले आहे. काढण्यात आलेल्या या संधीसाधू यात्रेविरोधात तीव्र संताप वाढत आहे. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही या हिंसेचे समर्थन बिलकूल करत नाही. मात्र संतप्त झालेल्या युवकांवर आणि महिलांवर पोलिसांनी लाठीमार करुन त्यांचा आवाज दडपणेही चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांना फक्त एकच विनंती केली आहे की, भाजपला आता फक्त मतांच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवा असं आवाहनही त्यांनी केले आहे.

हे ही वाचा >> Maratha Morcha : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तब्येतीलबद्दल पथकाने दिली माहिती

मध्य प्रदेशमध्ये शांतता राहू दे

रणदीप सुरजेवाला यांनी त्या पुढं जाऊन असं लिहिलं आहे की, माझी शिवराज यांना विनंती आहे की, भाजपला आता रोजचा वाढणारा विरोध ओळखून त्यांनी एक धडा घ्यावा. आणि ही भाजपची संधीसाधू यात्रा तात्काळ संपवावी आणि मध्य प्रदेशमध्ये शांतता प्रस्थापित करावी असा टोला त्यांनी लगावला आहे.

नॅशनल पार्कचा मुद्दा गाजणार

एकीकडे आशिर्वाद यात्रेचा मुद्दा गाजत असतानाच कुनो नॅशनल पार्कनंतर मंदसौरच्या गांधीसागर वन्यजीव अभयारण्यातील चित्यांचे नवे निवासस्थान प्रस्तावित केले आहे. या अभयारण्याच्या हद्दीला लागून असलेली जमीन संपादित करुन चित्यांसाठी कुंपण तयार केले असल्याचे वृत्त आहे. मात्र ज्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी येत असल्याचा आरोपही केला जात आहे. या मुद्यावरूनही येथे जोरदार आंदोलन झाले होते.

अशी असणार जनवादी यात्रा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक दिवस आधी 4 सप्टेंबर रोजी जन आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता. या यात्रेची सुरुवात 6 सप्टेंबरला होणार असून23 सप्टेंबरला सांगता होणार आहे. ही यात्रा 17 दिवसात माळवा-निमारच्या 42 विधानसभेच्या भागातून जाणार असून ही यात्रा 2 हजार किलो मीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.

    follow whatsapp