– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते सरकारमधील मंत्र्यांनी मध्यस्थी करूनही मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ वाद शांत होण्याची चिन्हे नाहीत. दोन्हींकडून शब्दांचे बाण डागले जाताहेत. त्यातच आता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्ला चढवला. भुजबळांबद्दल प्रश्न येताच चिडलेल्या जरांगेंनी मनात येईल ते बोलून संताप व्यक्त केला.
जरांगे भुजबळांबद्दल काय काय बोलले?
छगन भुजबळांबद्दल प्रश्न विचारताच जरांगे म्हणाले, “ते पागल झालं आहे. त्याला काय करावं तेच कळेना. मराठे ओबीसीत येऊ नये, असे त्याला वाटते, पण नेमके 54 लाख मराठे ओबीसीत येऊन बसले आहेत. आता आठ-दहा दिवसांत अडीच कोटींपेक्षा जास्त मराठे ओबीसी आरक्षणात जातील. त्या आधारावर. त्याचा प्रॉब्लेम उलटा होऊन बसला आहे. त्याचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे की, गाव-खेड्यातील ओबीसी बांधवांना काय वाटतं, मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या नसत्या तर आपण त्यांना विरोध केला असता. पण, त्यांचं सगळं सापडलं. कायद्याच्या चौकटीत आहे. त्यांना घेऊच नका असे आपले नेते कसं काय म्हणताहेत.”
हेही वाचा >> काँग्रेसला मोठा झटका! सुनील केदार यांची आमदारकी रद्द
भुजबळांवर टीका करताना जरांगे इथेच थांबले नाही. ते पुढे म्हणाले, “खेड्यातील ओबीसींना वाटतं की, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मिळायला पाहिजे. कारण त्यांच्या नोंदी सापडल्यात. खऱ्याला खरं म्हणणारे गावखेड्यात लोक आहेत, पण तो त्यात मोडत नाही. खोटं रेटून बोलायची सवय असल्यामुळे ते पूर्ण आरबळून (गोंधळून) गेलं आहे. त्याला काय करावं ते कळेना. मला त्याला इथून पुढे महत्त्व सुद्धा द्यायचं नाही. ते पूर्ण पागल झालं आहे”, अशी टीका करत त्यांनी भुजबळांवर प्रहार केला.
मराठ्यांना मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही घ्यावा लागणार -मनोज जरांगे
“आता उपोषणामुळे शरीर साथ देत नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल होईल. एक-दोन दिवसांत चांगलं वाटलं तर सहावा टप्पा होऊ शकतो. मला खरंच खंत वाटली की, बीडचे मुस्लीम बांधव आले होते. कालही मुस्लीम समाज मोठ्या संख्येने आला होता. दलित, ओबीसी बांधव आलेले होते. सगळा समाज सोबत आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही मराठा बांधवांना घ्यावा लागणार”, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
हेही वाचा >> “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”, शरद पवारांनी मानले आभार
“आज 24 डिसेंबर, तुम्ही दिलेली मुदतवाढ संपलीये. सरकार या मुद्द्यावर गंभीर वाटत नाही का? असा प्रश्न जरांगे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “गंभीर असतं, तर आतापर्यंत मिळालं असतं. त्यांना वाटतं हे आमचेच आहेत. त्यांच्या लक्षातच नाही की हा पूर्वीचा मराठा राहिलेला नाही. मुलासाठी हा मराठा समाज कुणाचाही सुपडा साफ करू शकतो. राजकीय करिअर बर्बाद करू शकतो. ज्यांना मोठं केले ते राजकीय नेते वेड्यात काढत आहेत म्हणून मराठा समाजात प्रचंड चीड आहे. मराठा समाज सोबत नसल्यावर काय होतं, हे यावेळी समाज दाखवून देणार आहे”, असा संताप जरांगे पाटील यांनी मराठा आमदार खासदारांबद्दल व्यक्त केला.
ते बधीर झालंय, भुजबळांना सुनावलं… जरांगे काय म्हणाले?
छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना डबल डबल भाषण करू नका, तब्येत सांभाळा असा सल्ला दिला. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “तू नको सल्ले देऊ म्हणा मला, गप्प बस. ते कामातून गेलंय पूर्ण. त्याचं स्वप्न होतं की, मराठे ओबीसीमध्ये येऊ नये. आणि नेमकं 54 लाख मराठे ओबीसी आरक्षणात आले. ते झालंय बधीर. त्याला काहीच सूचेना. आता काही दिवसांनी ते कागदच खातंय. कागद खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता. ते पूर्णपणे बावचळून गेलं आहे. त्याला काही किंमत द्यायची नाही, असं ठरवलं आहे.”
ADVERTISEMENT