Aurangabad आणि उस्मानाबाद ही नावं लावावीच लागणार, कसं ते समजून घ्या!

मुंबई तक

24 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 03:01 PM)

The names Aurangabad and Osmanabad will also remain: मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) आज (24 फेब्रुवारी) राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्ष शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांची मागणी होती. अखेर आता औरंगाबादचं […]

Mumbaitak
follow google news

The names Aurangabad and Osmanabad will also remain: मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) आज (24 फेब्रुवारी) राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्ष शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांची मागणी होती. अखेर आता औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) तर उस्मानाबादचं नाव हे धाराशिव (Dharashiv) असणार आहे. ज्याबाबतचा शासन आदेश जारी झाला आहे. मात्र, असं असलं तरी औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही दोन नावं तूर्तास तरी कायम राहणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? तर तेच आम्ही आपल्याला उलगडून सांगणार आहोत. (chhatrapati sambhajinagar and dharashiv new name but the names aurangabad and osmanabad are forever how to understand it)

हे वाचलं का?

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवला आहे. तसेच भाजपने केलेल्या नामकरणाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं देखील आवाहन केलं आहे.

आता औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदललं जाणार यावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झालं आहे. पण असं असलं तरीही ही दोन्ही नावं सध्या तरी कायम राहणार आहेत. ते कसं हेच आपण आता समजून घेऊया.

मोठी बातमी: Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, केंद्र सरकारची मंजुरी

…तरीही औरंगाबाद आणि उस्मानाबाद लावावंच लागणार!

केंद्र सरकारने जारी केलेल्या शासन आदेशानुसार (GR)औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर असं असेल तर उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असणार आहे. पण यामधील महत्त्वाची बाब म्हणजे ही दोन्ही नावं फक्त शहरांची बदलण्यात आली आहेत. म्हणजेच या दोन्ही जिल्ह्यांची नावं मात्र सध्या तरी कायम आहेत.

पाहा जीआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे:

Government of India has ‘no objection’ to change the name of City “Aurangabad” (“औरंगाबाद”) as “Chhatrapati Sambhajinagar” (“छत्रपती संभाजीनगर”) in Dist. Aurangabad, Maharashtra

जीआरमधील या वाक्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील ‘औरंगाबाद’ या शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यास भारत सरकारची कोणतीही हरकत नाही.

Government of India has ‘no objection’ to change the name of City “Osmanabad” (“उस्मानाबाद”) as “Dharashiv” (“धाराशिव”) in Dist. Osmanabad, Maharashtra

जीआरमधील या वाक्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘उस्मानाबाद’ या शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्यास भारत सरकारची कोणतीही हरकत नाही.

गुगलने चूक सुधारली, पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावं मॅपवर

म्हणजेच जी नावं बदलण्यात आली आहेत. ती फक्त दोन शहरांचीच बदलण्यात आली आहेत. त्यामुळे हे नामकरण फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांपुरताच मर्यादित आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या नावांवर अद्याप तरी होणार नाही.

म्हणजेच पत्ता लिहिताना छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद किंवा धाराशिव, जिल्हा उस्मानाबाद असंच येथील रहिवाशांना लिहावं लागणार आहे.

आता या सगळ्याबाबत शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp