Eknath Shinde: पहाटे तीन वाजता मुख्यमंत्री पोहोचले जगतापांच्या घरी

मुंबई तक

20 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 07:08 PM)

Chinchwad Bypolls 2023: पिंपरी-चिंचवड: चिंचवड विधानसभा निवडणूक युती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. युतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल कलाटे हे अपक्ष असल्यानं तिहेरी लढत होताना दिसत आहे. अशात चिंचवडची जागा कायम राखण्यासाठी भाजपकडून जिवाचं रान सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

Chinchwad Bypolls 2023: पिंपरी-चिंचवड: चिंचवड विधानसभा निवडणूक युती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. युतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल कलाटे हे अपक्ष असल्यानं तिहेरी लढत होताना दिसत आहे. अशात चिंचवडची जागा कायम राखण्यासाठी भाजपकडून जिवाचं रान सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आता मैदानात उतरले आहेत.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पहाटे 3 वाजता जगताप कटुंबीयांची भेट घेतली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

लक्ष्मण जगताप यांच्या अश्विनी जगताप यांना भाजपनं तिकीट दिलेलं असून, त्यांच्या विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले अश्विनी जगताप या बहुमताने विजयी होती, असं ते म्हणाले.

भगतसिंह कोश्यारींबद्दल प्रश्न विचारताच शिंदेंनी जोडले हात

दरम्यान, माध्यमांनी त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारला. भगतसिंह कोश्यारी असं म्हणाले की ‘उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये अडकले.’ त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी हात जोडले आणि म्हणाले की, ‘गेले बिचारे, जाऊद्या’, असं म्हणत त्यांनी अधिकचं बोलणं टाळलं.

Thackeray यांनी कशी गमावली शिवसेना… आयोगाने का दिला शिंदेंच्या बाजूने निर्णय?

चिंचवड पोटनिवडणूक: तिहेरी लढतीमुळे निकालाबद्दल अनिश्चितता

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी आमचाच उमेदवार निवडून येणार असे दावे प्रचारादरम्यान करत आहे. मात्र, निकालाबद्दलची अनिश्चितता दिसून येत आहे. भाजपनं अश्विनी जगताप यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना सहानुभूती किती मिळते, यावर त्यांच्या मतांचं गणित अवलंबून असून, राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपच्या जगतापांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाशी आघाडी केलेल्या वंचित बहुजन आघाडीने मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जगताप आणि काटे यांचं राहुल कलाटेंमुळे टेन्शन वाढलेलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कलाटेंनी 1 लाख 12 हजार मतं घेतली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता.

Koshyari: ‘माझं आदित्यवर मुलाप्रमाणे प्रेम..’, कोश्यारींनी सांगितलेला किस्सा काय?

भाजपने दिले झोकून, महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार

चिंचवडची जागा जिंकण्यासाठी भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने प्रतिष्ठपणाला लावली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही आता चिंचवड पोटनिवडणूक प्रचारात दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी विजय मिळवण्यासाठी जोरात प्रचार सुरू असून, विजय कुणाचा होणार आणि कुणाचे विजयाचे दावे खरे ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

    follow whatsapp