दिल्ली : कधी ‘बिकिनी गर्ल’ तर कधी ‘स्कर्ट बॉईज’… अलिकडील काळात दिल्ली मेट्रो या सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांमुळे चर्चेत आहे. कधी मेट्रोमध्ये डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होता. तर एकदा कपल किस करताना दिसले होते. यावर आता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने पुन्हा एकदा लोकांना मेट्रोमध्ये कोणालाही त्रास होईल असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे. डीएमआरसीचे यासंदर्भातील ट्विट व्हायरल होत आहे. (Delhi Metro Rail Corporation (DMRC) has once again appealed to people not to do anything that could cause trouble to anyone in the metro.)
ADVERTISEMENT
डीएमआरसीने या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मेट्रोमध्ये Travel करा, Trouble नाही.’ यासोबतच तुमच्या डान्सचा मेट्रो प्रवाशांवर किती प्रभाव पडतो, हे एका मजेशीर चित्रासह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. DMRC ने शेअर केलेल्या चित्रात, मायग्रेन, हायपरटेन्शन आणि तणावाच्या वेळी मेंदूतील परिस्थिती लाल रंगात दाखविण्यात आली आहे. तर सर्वात वाईट परिस्थिती मेट्रोमध्ये कोणीतरी डान्स करत असते तेव्हा होते, असे दाखवले आहे.
डीएमआरसीच्या या ट्विटला आतापर्यंत 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनीही प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, मेट्रो प्रवासासाठी आहे, नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी नाही. दुसर्याने म्हटले की, डीएमआरसीला कठोर व्हावे लागेल. तिसरा म्हणाला, अशा लोकांना दंड लावा. तर अशा प्रकारची कृत्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. नुसते आवाहन करून चालणार नाही, असेही एका युजरने म्हटले.
Viral Video : बिकिनी, कपल किस आणि पेपर स्प्रे …या घटनांनमुळे दिल्ली मेट्रोत सापडली वादात
‘बिकिनी गर्ल’ विरुद्ध’स्कर्ट बॉईज’ :
अलीकडेच दिल्ली मेट्रोमध्ये रिदम चन्ना नावाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ही तरुणी बिकिनी घालून मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली होती. यावरून सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला. तर या वादावर बोलताना रिदमने तिला हवे ते कपडे ती घालू शकतो, असा दावा केला होता. ती म्हणाली होती, अनेकवेळा लोक मला धमक्याही देतात पण त्यांच्यात काही करण्याची हिंमत दिसत नाही. कपड्यांना विरोध करणाऱ्यां अशा लोकांच मला हसू येत असल्याचंही ती म्हणाली होती.
Video: दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल, अन् प्रवाशांची उडाली तारांबळ
रिदमनंतर, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, यात दोन मुले स्कर्ट घालून मेट्रोमध्ये फिरताना दिसले होते. इतर प्रवासी त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत असल्याचही दिसत होते. sameerthatsit नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक मुलगी भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसली होती. अवनी करिश असे या मुलीचे नाव आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. दिल्ली मेट्रोच्या आणखी एका व्हिडिओवरून बराच गदारोळ झाला होता. यामध्ये एक कपल खुलेआम किस करताना दिसले होते.
डीएमआरसीचे आवाहन :
अलीकडेच, डीएमआरसीने प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवास करताना सार्वजनिक मर्यादेचे भान राखण्याचे आवाहन केले आहे. डीएमआरसीने म्हटले होते की प्रवाशांनी सामाजिक शिष्टाचाराचे पालन करावे अशी आमची अपेक्षा आहे. प्रवाशांनी असा कोणताही पोशाख घालू नये किंवा सहप्रवाशांच्या भावना दुखावणारी कोणतीही कृती करू नये. कारण डीएमआरसीच्या ऑपरेशन अँड मेंटेनन्स कायद्याच्या कलम-59 अंतर्गत असभ्यता हा दंडनीय गुन्हा मानला गेला आहे. प्रवास करताना कपड्यांची निवड ही वैयक्तिक बाब आहे, परंतु प्रवाशांनी जबाबदार नागरिकाप्रमाणे वागणे अपेक्षित आहे, असेही डीएमआरसीने असेही म्हटले आहे.
ADVERTISEMENT