Dombivali : खाडी किनारी खेळता खेळता लेक पाण्यात पडली, वाचवायला गेलेल्या बापानेही गमावला जीव

मिथिलेश गुप्ता

• 03:43 AM • 24 Dec 2023

डोबिवली पश्चिमेतील राजुनगर भागातील खाडीकिनारी असलेल्या संकुलात अनिल सुरवाडे त्यांच्या लेकीला म्हणजेच हिरा सुरवाडे हिला खेळण्यासाठी घेऊन आले होते. यावेळी खेळता खेळता अचानक तोल जाऊन हिरा सुरवाडेही खाडीत पडली होती.

dombivali news

dombivali news

follow google news

Dombivali News : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बाप-लेकीचा (Father- Daughter) खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अनिल सुरवाडे असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या वडिलाचे नाव आहे, तर हिरा सुरवाडे असे या मुलीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलीस (police) आणि अग्निशमन दलाने शोधमोहीम राबवली होती. मात्र अद्याप मृतदेहाचा शोध लागला नाही आहे. दरम्यान बाप-लेकीच्या खाडी किनारी झालेल्या मृत्यूने डोंबिवलीत (Dombivali) खळबळ माजली आहे. (dombivali news father and daughter drown in creek dombivali police news)

हे वाचलं का?

डोबिवली पश्चिमेतील राजुनगर भागातील खाडीकिनारी असलेल्या संकुलात अनिल सुरवाडे त्यांच्या लेकीला म्हणजेच हिरा सुरवाडे हिला खेळण्यासाठी घेऊन आले होते. यावेळी खेळता खेळता अचानक तोल जाऊन हिरा सुरवाडेही खाडीत पडली होती. यावेळी मुलीला खाडीत बुडताना पाहून अनिल सुरवाडे यांनी खाडीत उडी घेतली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बापलेक बुडू लागले होते.

हे ही वाचा : Sharad Pawar : “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”

दरम्यान खाडी किनारी उभ्या असलेल्या चांद शेख नावाच्या तरूणाने हा संपूर्ण प्रकार आपल्या डोळ्याने पाहिला असता, लगेच बचावासाठी धाव घेतली होती. मात्र तोपर्यंत बापलेकीचा बुडून मृत्यू झाला होता. चांद शेख यांना काही अंतरावर वडिलांचा हात दिसला होता. मात्र तिथपर्यंत खुपच उशीर झाला आणि बापलेकीचा बुडून मृत्यू झाला.

या संपूर्ण घटनेनंतर चांद शेखने माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर म्हात्रे यांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे आपल्या पोलीस पथकासह खाडीकिनारी पोहोचलेत त्यांच्यासह अग्निशमन दलाचे पथकही पोहोचले. आणि बापलेकीच्या सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडी परिसरात 5 किमी अंतरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत. सायंकाळी 4 च्या दरम्यान बचावकार्य थांबविण्यात आले.

हे ही वाचा : Maratha Reservation : क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली! CM शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन, ‘वकिलांची फौज…’

दरम्यान आता याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसेच मुलगी व वडील बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पुन्हा खाडी परिसर, मोठागाव परिसरात वडील लेकीचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp