Pune : गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान वडिलांचे निधन

मुंबई तक

05 Sep 2023 (अपडेटेड: 05 Sep 2023, 02:32 PM)

Gautami patil Father Ravindra patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील यांचे पुण्यात निधन झाले. ते धुळ्यामध्ये बेवारस अवस्थेत आढळून आले होते. गौतमीने त्यांनी उपचारासाठी पुण्यात आणले होते.

Gautami Patil's father ravindra patil passed away

Gautami Patil's father ravindra patil passed away

follow google news

Gautami Patil Father : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर बिबवेवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. (Gautami Patil’s father ravindra patil passed away)

हे वाचलं का?

गेल्या काही वर्षांपासून गौतमी पाटीलचे आई-वडील वेगवेगळे राहतात. गौतमी तिच्या आईसोबत राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. धुळ्यातील दुर्गेश चव्हाण यांना ते दिसले होते.

हेही वाचा >> Gautami Patil : ‘पाटील’ आडनाव बदलावं? गौतमीच्या गावातील लोक म्हणतात…

दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील हे गौतमी पाटीलचे वडील असल्याचे माहीत नव्हते. रवींद्र पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी रवींद्र पाटलांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डमुळे रवींद्र चव्हाण यांची ओळख पटली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती.

गौतमी पाटीलने उपचारासाठी आणले होते पुण्यात

दरम्यान, वडील आजारी असल्याची माहिती कळल्यानंतर गौतमी पाटीलने वडील रवींद्र पाटील यांना पुण्यात उपचारासाठी आणले होते. त्यांना बिबवेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी (4 सप्टेंबर) त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा >> गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक

रवींद्र पाटील यांना होतं दारूचे व्यसन

रवींद्र पाटील यांना दारूचे व्यसन जडलेले होते. त्यामुळेच गौतमी पाटील आणि तिची आई हे पुण्यात राहायला आले होते. गौतमी पाटीलचे बालपण पुण्यातच गेले. याच काळात तिला नृत्याची आवड लागली. तिने काही काळ ऑर्केस्ट्रामध्येही काम केलं. गेल्या काही वर्षापासून गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम खूपच प्रसिद्ध झाले. त्यामुळे सध्या ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

    follow whatsapp