Gold-Silver Rate Today : रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीची प्रचंड खरेदी वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आणि भाऊरायांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशावेळी आज (14 ऑगस्ट 2024) सोन्या-चांदीचा भाव काय आहे हे जाणून घेऊयात. (gold silver price rises again what is todays 14th august gold rate in mumbai-pune for 10 gram)
ADVERTISEMENT
गुड रिटर्न्स या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट (14 ऑगस्ट) सोनं मंगळवारच्या (13 ऑगस्ट) तुलनेत 110 रुपये प्रति एक ग्रॅमने घसरले आहेत. त्यामुळे 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याची किंमत 71,510 रुपये झाली आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 100 रुपयांनी कमी झाली आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?
यंदा सोन्याच्या किंमतीत 7 हजार रूपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी सोन्याचा भाव 63,352 रुपये होता. पण आता मात्र, 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीचा भाव 83,600 वर पोहोचला आहे. तुम्हाला माहित नसेल पण, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 550 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 510 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,630 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 540 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,660 रूपये आहे.
हेही वाचा : Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Devendra Fadnavis: "अरे वेड्यांनो...", देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांवर संतापले
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT