Gold Price Today: 'सोनियाच्या ताटी... ओवाळीते भाऊ राया रे'; रक्षाबंधनापूर्वी सोन्याचे भाव वाढले!

रोहिणी ठोंबरे

• 11:26 AM • 16 Aug 2024

Gold Rates: सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाचा सण जसजसा जवळ येतोय, तशी बाजारात दागिन्यांची मागणी आणि भाव वाढत आहेत.

Mumbaitak
follow google news

Gold-Silver Price Today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाचा सण जसजसा जवळ येतोय, तशी बाजारात दागिन्यांची मागणी आणि भाव वाढत आहेत. त्यामुळे सणसमारंभाच्या पार्श्वभूमीवर आज (16 ऑगस्ट) बाजारात सोने-चांदीचा दर वाढलाय की कमी झालाय हे जाणून घेऊयात. (gold-silver prices today 16th august gold rate in maharashtra for 10 gram rises before rakshabandhan know the details

हे वाचलं का?

अलीकडेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती. पण, त्यानंतर मात्र कधी सोन्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळते तर कधी थोड्याफार प्रमाणात घसरण पाहायला मिळते. अशापरिस्थितीत, आज (16 ऑगस्ट) सोन्याने पुन्हा भाव खाल्ला आहे तर, चांदीची चमकही वाढली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील 'राज'कारण पडद्यावर झळकणार? राज ठाकरेंचा बायोपिक येणार? 'त्या' फोटोमुळं चर्चांना उधाण

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (15 ऑगस्ट 2024) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 71,510 रुपये होता. पण आज (16 ऑगस्ट) 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव  110 रूपयांनी वाढलेला असून 71,620 रूपये किंमत झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव 84,000 रूपयांवर पोहोचला आहे.

तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 620 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,720 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 620 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,720 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 620 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,720 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65, 680 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 71, 650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 53,750 रूपये आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत ढगाळ वातावरण तर, पुणेकरांना थेट इशारा! पहा हवामान विभागाचा अंदाज

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो. 

हेही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

    follow whatsapp