Rules Change : आपल्या देशात महिन्याचा पहिला दिवस अगदीच खास असतो. कारण महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल झालेले असतात, आणि तेच बदल जनसामान्यांच्या खिशावर होत असतात. त्यातच आता सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा आहे. आता पुढील महिना ऑक्टोबर (1 october) असून त्या महिन्याच्या 1 तारखेपासूनच देशात काही बदल होणार आहेत. त्यामुळे त्या बदलांची माहिती सामान्य नागरिकांना होणे गरजेचे आहे. पुढील महिन्यापासून देशात काही महत्वाचे बदल (rules change) होणार आहेत, ते बदल पुढीलप्रमाणे आहेत. (government will change rule october major changes in lpg petrol and Aadhar card)
ADVERTISEMENT
आता 2 हजारची नोट चालणार नाही
देशात आता 2 हजार रुपयांची नोट चालणार नाही. त्यामुळे तुमच्याजवळ जर 2 हजार रुपयांची नोट असेल, ती बदलून घेतली नसेल तर 30 सप्टेंबरपर्यंत ती नोट बदलून घ्या. कारण 2 हजारची नोट बदलण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर आहे.
सीएनजी-पीएनजीमध्येही बदल
एलपीजीच्या किमतीबरोबरच तेल कंपन्याकडूनही सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही महिन्याला दर बदलत असतात. एअर फ्युएल (ATF)ची किंमतदेखील महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल असते. यावेळीही 1 तारखेला यांच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच सीएनजी-पीएनजीच्या किंमतीही बदल होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> ‘बाकीच्या कारखान्यांना मदत, माझ्या…’, पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील खदखद
एलपीजीच्या दरामध्ये बदल
देशातील ऑईल अँड गॅस डिस्ट्रीब्युशनकडूनही महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमतीत बदल केले जातात. त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून किंमतीत चढउतार होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.
परदेशी प्रवास महाग होणार
तुम्ही जर भविष्यात परदेशी जाण्याचा प्लॅन आखत असाल तर 1 ऑक्टोबरपासून परदेशी जाणं महाग पडणार आहे. 1 ऑक्टोबरपासून 7 लाख रुपयांपेक्षा जास्त टूर पॅकेजसाठी 5 टक्के टीसीएस भरावे लागणार आहे. तर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या टूर पॅकेजसाठी 20 टक्के TCS भरावे लागणार आहेत.
लिंक करायला विसरु नका
पीएफ, पोस्टाच्या योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. या योजनांसाठी तुम्ही आधार लिंक केले नसेल तर मात्र 1 ऑक्टोबरपासून तुमचे अकाऊंट गोठवले जाणार आहे. त्यामुळे त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवहार आणि गुंतवणूकही करू शकणार नाही.
नॉमिनेशन बंधनकारक
सेबीने ट्रेडिंग खाते, डीमॅट खाते आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबरपर्यंत नामांकन म्हणजेच नॉमिनेशन दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे केले नाही तर 1 ऑक्टोबरला ही खाती गोठवली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> NCP Split : ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान
प्रमाणपत्र सक्तीचे
सरकारी कार्यालयामधील काही नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत.
1 ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालय, सरकारी नोकरीसाठी अर्ज, आधार कार्ड नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी प्रमाणपत्र लागणार आहे.
ADVERTISEMENT