Uttar pradesh News : लग्न म्हटलं तर वादविवाद, नाराजी आलीच, कधी मानपमानावरून, तर कधी मुलींकडच्यांकडून लग्नाच्या तयारीत कुठली कमतरता राहिली तर नवरदेवाकडची मंडळी नाराज, या अशा सगळ्या गोष्टी लग्नात घडतच असतात. मात्र कितीही काही झाले तरी लग्न पार पडतचं. मात्र ही घटना याला अपवाद ठरली आहे. कारण या घटनेत नवरदेवाने नवरीला भर मंडपात उचल्या कारणाने नववधू नाराज होऊन लग्न मोडल्याची घटना घडली आहे. या अशा कारणाने लग्न मोडल्याने या लग्नाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. (groom picked her up in his lap during the jaymala bride got angry uttar pradesh sambhal story)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये ही घटना घडली आहे. संभलच्या सातपुरा गावात 13 मार्चला एक लग्न होतं. या लग्नानिमित्त गावात नवरदेवाची चांगली वरात काढण्यात आली होती. या वरातीचे वधुकडच्या मंडळींनी मोठ्या उत्साहात स्वागत देखील केले होते. या वरातीनंतर नवरदेव लग्नाच्या स्टेजवर पोहोचला. त्यानंतर स्टेजवर नववधुची एन्ट्री झाली.
हे ही वाचा : फडणवीस सरकारमध्ये राहणार की जाणार? दिल्लीत झाला मोठा निर्णय
दोघेही नवरदेव आणि नववधू स्टेजवर पोहोचताच हार घालण्यास आणि सात फेऱ्यास सुरुवात होते. मात्र हा रिवाज होण्याआधीच नवरा उत्साहात नववधूला उचलून घेतो. नवऱ्याच्या भरमंडपातील या कृतीला नववधू आक्षेप घेते. आणि लग्नाचा स्टेज सोडून निघून जाते. त्यानंतर नवरदेव नववधूला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र वधू त्याचे काही न ऐकता निघून जाते. त्यानंतर मुलीचे नातेवाईकही तिला शांत करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र वधु लग्नास स्पष्ट नकार देते.
वधूने लग्नाला नकार देताच वराकडच्या मंडळीची घरात एक मिटींग झाली. या मिटींगमध्ये दोन्ही वधू-वर पक्षाच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस स्टेशनही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना बसवून बोलायला लावले, मात्र तरीही वधू लग्नास तयार झाला नाही. तसेच तिने लग्नात हुड्ड्यात दिलेल्या वस्तुही परत मागून घेतल्या. त्यामुळे नवरदेवाचा मोठा कार्यक्रम झाला. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
ADVERTISEMENT