Lonavala Bhushi Dam Accident : (कृष्णा पांचाळ, लोणावळा) रविवारी (30 जुलै) सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरातील आहे, ज्यात एका कुटुंबातील 9 ते 10 लोक पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. हे कुटुंब कोण आणि ते भूशी डॅम परिसरात कसे आले? (lonavala bhushi dam incident)
ADVERTISEMENT
लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरात अचानक पाणी वाढल्याने पाण्यात 9 ते 10 जण वाहून गेले. यात 4 आणि 9 वर्षाच्या मुलगाचाही अजूनही शोध घेतला जात आहे. युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ज्या कुटुंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली, तो पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते.
भूशी डॅम व्हिडीओ : पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यद नगर भागात हे कुटुंब राहते. 16-17 लोक फिरण्यासाठी लोणावळ्याला आले. एक खासगी बस या कुटुंबाने फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती.
लोणावळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, 30 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि कुटुंबातील 10 लोक वाहून गेले.
त्यातील काही जण जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. एका मुलीला आणि इतर काही जणांना वाचवण्यात लोकांना यश आले.
हेही वाचा >> महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला मुख्य सचिव, कोण आहेत सुजाता सौनिक?
वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36), अमिमा आदिल अन्सारी (वय 13) आणि उमेरा आदिल अन्सारी (वय 8) याचा मृत्यू झाला. यात काही लोकांचे मृतदेह भूशी डॅमच्या किनाऱ्यावर आढळून आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदनान सभाहत अन्सारी (वय 4) आणि मारिया अकिल अन्सारी (वय 9) हे अजूनही बेपत्ता आहेत.
हेही वाचा >> जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?
बचाव पथकांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अन्सारी कुटुंबातील सदस्य भूशी धरण्याजवळ असलेला धबधबा बघण्यासाठी गेले होते.
लग्नासाठी आले होते नातेवाईक
ज्या कुटुंबासोबत ही घटना घडली, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, काही नातेवाईक लग्नासाठी मुंबईवरून आले होते. रविवारी 16 लोक बसने फिरण्यासाठी लोणावळ्याला गेले होते.
ADVERTISEMENT
