Puneri patya news : पुणे तिथे काय उणे, अशी एक प्रचलित म्हण तुम्ही ऐकलीच असेल. पुण्यात कधी काय होईल आणि त्याची सगळीकडे चर्चा होईल, हे सांगता येत नाही. आता पुण्यातील दोन पुणेरी पाट्यांची चर्चा होत आहे. एका ग्रुपने लावलेल्या पाटीला दुसऱ्या ग्रुपने उत्तर पाणउतारा केला आहे. नेमक काय घडलंय? (Puneri patya Goes Viral on Social Media)
ADVERTISEMENT
पुण्यातील डेक्कन भागात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या दोन पाट्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ग्रुपने सिंधुताई सपकाळ यांचा विचार लावला आहे. त्याला दुसऱ्या ग्रुपने उत्तर दिले आहे.
नेमकं काय लिहिलं आहे?
मस्त ग्रुपने लावलेल्या पाटीवर सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने विधान छापलेले आहे.
हेही वाचा >> उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज
"महिलांनो असे कपडे घाला की, कोणी वाईट नजरेने बघता कामा नये." असे छापलेले आहे आणि सौजन्य मस्त ग्रुप असा उल्लेखही करण्यात आलेला आहे.
त्रस्त ग्रुपने काय दिलंय उत्तर?
याला त्रस्त ग्रुपने उत्तर दिलंय. 'पुरुषांनो मन इतकं निखळ ठेवा की, कुणी कसेही कपडे घातले, तरी नजर घसरता कामा नये."
हेही वाचा >> मलिकांमुळे महायुती कात्रीत, आता भाजप काय करणार?
यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहे. एका व्यक्तीने दोन्ही पाट्यांवरील मजकूर इंग्रजीत भाषांतरीत करून टाकला आहे. त्यावरही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
ADVERTISEMENT