Badlapur Case: 'त्यांची रस्त्यावरून धिंड काढा..', पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले आदेश

इम्तियाज मुजावर

23 Aug 2024 (अपडेटेड: 23 Aug 2024, 10:43 PM)

टवाळखोरी करणाऱ्या युवकांची धिंड काढा असे आदेशच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना दिले आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

टवाळखोरी करणाऱ्या युवकांची धिंड काढण्याचे आदेश

point

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून पोलिसांना आदेश

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर सरकार अलर्ट मोडवर

सातारा: बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. आज त्यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या सातारा जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत शाळा कॉलेज यांना महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. (after the badlapur sexual assault case minister shambhuraj desai has given some important orders to the police)

हे वाचलं का?

यामध्ये शाळा कॉलेजमध्ये असणाऱ्या स्वच्छता गृहांच्या एन्ट्री पॉईंटमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला आणि मुलींच्या स्वच्छतागृहाची देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी असे देखील आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> Exclusive: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नावे अणि मोबाइल नंबर देण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत 2021 ला 3819 कारवाया केलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये 27 हजार 629 कारवाया या प्रकल्पांतर्गत केलेले आहेत. 

यावर्षी जुलै महिन्यापर्यंत 7693 कारवायांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. या कारवायांमध्ये ज्या विद्यार्थ्यावर तीन वेळा कारवाई झाली असेल किंवा वारंवार कारवाई झाली असेल अशा विद्यार्थ्यांची धिंड पोलिसांना काढण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

बदलापूरमधील नेमकं प्रकरण काय?

आरोपी अक्षय शिंदे याने बदलापूरमधील एका शाळेतील दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण या घटनेची तक्रार घेण्यास बदलापूर पोलिसांनी तब्बल 12 तास लावले होते. ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोपी आणि पोलिसांविरोधात उद्रेक झाला. सुरुवातीला आंदोलकांनी थेट शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. तर त्यानंतर दुसरीकडे बदलापूर स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर उतरून तब्बल 9 तास आंदोलन केलं होतं.

हे ही वाचा>> Pune Crime: 13 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मित्राकडून बलात्कार, दारू पाजली अन् नंतर...

आरोपीला तात्काळ फाशी द्या ही मागणी करत आंदोलकांनी 9 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता. या दरम्यान, अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर पोलिसांना लाठीहल्ला करत आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.

    follow whatsapp