Student Dies Silent Heart Attack Indore, Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची हृदय विकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजा लोधी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. राजा हा इंदुरमधील (Indore) खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकतो. घटनेच्या दिवशी क्लासेसमध्ये शिकत असताना अचानक तो बँचवर कोसळल्याची घटना घडली होती. राजा कोसळल्याचे पाहून त्यांच्या आजूबाजूचे विद्यार्थी त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण राजाला काही शुद्ध येत नाही.त्यामुळे त्याचे मित्र त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करतात. मात्र डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (indore viral video mppsc student dies due to silent attack indore madhya pradesh)
ADVERTISEMENT
राजा लोधी हा मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. यासाठी त्याने इंदूरमध्ये खाजगी कोचिंग सेंटरही लावले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी राजा कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी आला आणि वर्गमित्रांमध्ये बसला. काही वेळानंतर अचानक त्याचे डोके झुकले आणि तो बेंचवर बेशुद्ध होऊन कोसळतो. सुरूवातीला राजा झोपल्याचे सर्वाना वाटले. मात्र खूप वेळ झाल्यानंतर राजा उठत नसल्याने मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजा काही उठला नाही. त्यामुळे मित्रांनी तत्काळ त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्याच मृत्यू झाल्याचे सांगितले.
हे ही वाचा : ‘धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मारहाण’, गैरवर्तन…, करूणा शर्माचे खळबळजनक आरोप
डॉक्टरांनी राजाला तातडीने दाखल करून उपचार सुरू केले. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मात्र बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरं कारण समोर येणार आहे.
आम्ही वर्गात शिकत होतो. माझा मित्र राजाची तब्येत अचानक बिघडली. आम्ही त्याला 7 मिनिटांत रुग्णालयात नेले जेथे त्याचा मृत्यू झाला. त्याला सायलेंट अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती राजाचा मित्र सचिन आर्य याने दिली.
ADVERTISEMENT