Israel Kills Hamas Intelligence Deputy Chief : गाझा पट्टीत हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचे उपप्रमुख शदी बरौद याची हत्या केली. शदी बरौद याने हमासचा नेता याह्या सिनवार याच्यासोबत ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलवर हल्ला करण्याचा कट रचला होता. सिनवार हा इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडाचा सूत्रधार आहे.
ADVERTISEMENT
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, बरौद हा पूर्वी खान युनिस भागात बटालियन कमांडर होता. हमाससाठी गुप्तचर माहिती गोळा करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बरौदवर इस्रायली नागरिकांवर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप होता.
वाचा : PM मोदींकडून महाराष्ट्रासाठी मोठी भेट, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा
इस्रायली लष्कराने एक व्हिडीओही जारी केला आहे. यामध्ये इस्त्रायली हवाई दलाची विमाने एका इमारतीला लक्ष्य करत आहेत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात स्फोटके नष्ट करण्यात आली. याआधीही इस्रायलने हमास आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या अनेक कमांडर्सना ठार केले आहे.
याआधी इस्रायली लष्कराने हमासच्या नॉर्थ खान युनिस रॉकेट्स अॅरेचा कमांडर हसन अल अब्दुल्ला याला ठार केले. इस्त्रायली लष्कराने या हल्ल्याचा व्हिडीओही जारी केला आहे.
वाचा : Murder Case : काकाने पुतण्याचा गळा चिरला, अन् गरोदर सुनेच्या पोटातच…
हमासचे 3 वरिष्ठ अधिकारी मारले गेले
गुप्त माहितीच्या आधारे, आयडीएफने हमासच्या तीन वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या लपलेल्या ठिकाणांवरही हल्ला केला. या हल्ल्यात दराज तुफाह बटालियनचे तीन वरिष्ठ अधिकारी मारले गेले. या बटालियननेच ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलमध्ये घुसून नरसंहार घडवला होता.
ADVERTISEMENT