मुंबई तक/ मनीष जोग : देशात राम मंदिराच्या उद्घाटनाची धामधूम चालू असतानाच प्रभूरामावरून राजकारण, समाजकारण आणि आता सांस्कृतिक क्षेत्रही तापले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्या रामावरच्या विधानानंतर ज्ञानपीठ विजेतेकार भालचंद्र नेमाडे यांनीही जगातील अनेक रामायणाचे संदर्भ देत वाल्मिकींचा (Valmiki) राम खरा कशामुळे म्हणायचा असं मोठं विधान त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी ब्रिटिश म्युझियममधील रामायणाबरोबरच आसाम आणि इतर रामायणांचाही (Ramayan) संदर्भ दिला आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले आहे की,अनेक गोष्टीवर फक्त कशाकरिता चर्चा करायची, तर ते खरं आहे की नाही हे पाहत प्रत्यक्ष खोदून पाहायता आलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
थ्री हंड्रेड रामायण
कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी यावेळी रामायण शाकाहारी आहे की मासांहारी आहे यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्या खोलात जाऊन ते तपासले पाहिजे. त्यानंतर त्यावर चर्चा केली पाहिजे. नेमाडे यांनी थ्री हंड्रड रामायणाचा संदर्भ देत त्यावर का बंदी आली असा सवालही त्यांनी केला आहे.
औरंगजेबाने सती प्रथा बंद केली
औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले होते. त्याचबरोबर औरंगजेबाने सती प्रथा बंद केली होती. औरंगजेब हा सती प्रथा बंद करणारा पहिला राजा होता असं सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुख्य सेनापती मुसलमान होता, तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हा हिंदू होता असं वक्तव्यही त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावरूनही वाद झाला होता.
राम खरा कशामुळे
तर भालचंद्र नेमाडे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. रामायणं अनेक असून त्या रामायणामध्ये राम-सीता बद्दल वेगवेगळे संदर्भ आहेत. त्यातच रामायण लिहिणारा वाल्मिकी हा शुंग घराण्याचा दरबारी कवी होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेले वाल्मिकींचा राम खरा कशामुळे म्हणायचा असा सवाल उपस्थित करून त्यांच्या या सवालामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रामाबाबत नेमकं काय म्हणाले नेमाडे
लेखकाला न दिसणारं सत्य दिसलं पाहिजे. हे खोटं बोलतात राम मासांहारी होता की, शाकाहारी होता. आता हे वाचूनच लक्षात येतं, ही कशाकरिता चर्चा करायची. त्याच्यामुळे जे खरं आहे. ते प्रत्यक्ष खोदून पाहा. मग कळेल काय आहे. नुसतंच टीव्ही, भाषणं, चर्चा यातून सत्य कळणार नाही. प्रत्यक्ष जाऊन शोधणं. हे खरोखरच आहे का. ते खरोखरच म्हटलं आहे का, त्यात पुन्हा एकच रामायण आहे का. आमचे मित्र रामानुजन यांनी रामायणवर पुस्तक लिहिलं ते बंद पाडलं. ते कशामुळं बंद पाडलं. ब्रिटिश म्युझियममधील मी पाहिलेलं रामायण वेगळंच होतं. नंतर कंबोडियामधील राम वेगळाच आहे. जैन रामायणातील राम वेगळाच आहे. काही ठिकाणी राम-सीता बहिणी बहिणी आहेत. तर काही ठिकाणी सीता ही रावणाची मुलगी आहे.
असं सगळं राम म्हणजे साठ हजार वर्षापूर्वी धनुष्यबाणाचं युद्ध असतानाच्या काळातील नायक. त्याचं जे बदलत बदलत वाल्मिकीच्या काळापर्यंत आला, तो आता आपल्याला माहिती आहे तो राम. वाल्मिकी हा शुंग घराण्यातील दरबारी कवी होता. त्यांना आवडेल तसं त्यांनी रामायण लिहिले. शुंगांनी बौद्ध धम्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म हे आपल्या देशातील सगळ्यात जुने धर्म. हे सगळ्यात सामाजिक आणि अहिंसात्मक धर्म. त्यांचा नाश करणारे हे शुंग. आणि आपल्याकडचे शालिवाहन. यांनी तो नाश केला. आणि यांनी ब्राह्मण धर्म स्थापन केला. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की, खरे राम कोणते. वाल्मिकीचा राम कसा म्हणायचा. कारण आसाममध्ये एक मी रामायण बघितलं.
त्यांच्या रामायणातील सीता ही मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते. ती शिव्या देत असते रामाला. की तुला अक्कल नाही असं. आता ते मराठीत आलं पाहिजे. ते सगळं प्रोजेक्ट आले असले तरी कंबनाचं रामायण का नाही खरं. ही सगळीच रामायणं माहिती पाहिजे. नुसतंच एक रामायण नाहीय. टू हण्ड्रेड रामायण का नाही वाचू शकले. का नाही मिळू शकत. आणि मीही पोलिसांचं प्रोटेक्शन आहे म्हणून बोलू शकलो.
भालचंद्र नेमाेडे यांनी बोलताना यांनी जागतिक पातळीवर रामायणाचे कसे संदर्भ आहेत, राम, सीता, रावण आणि दरबारी कवी, लेखक कसे होते तेही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT