Raigad Fort: शिवभक्तांसाठी बॅड न्यूज... रायगड आजपासून पर्यटकांसाठी बंद, कोकणाला पावसानं तुफान झोडपलं!

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 04:43 PM)

Raigad fort Weather Update: कोकण किनारपट्टी भागात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच रायगड किल्ल्यावरून देखील पाण्याचे प्रचंड लोट वाहत असल्याने आता प्रशासनाने पर्यटकांसाठी हा किल्ला बंद केला आहे.

रायगड आजपासून पर्यटकांसाठी बंद

रायगड आजपासून पर्यटकांसाठी बंद

follow google news

बातम्या हायलाइट

point

रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

point

रायगडावर मुसळधार पावसामुळे प्रशासन सतर्क

point

कोकण किनारपट्टी भागात पावासाचा धुमाकूळ

Raigad fort and Konkan Rain Update: रायगड: कोकण किनारपट्टीलगत असलेल्या तीनही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच कोट्यवधी शिवभक्तांची पंढरी असलेला रायगड किल्ला हा आजपासून (8 जुलै) पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मागील 24 तासात रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच रायगड किल्ल्यावर देखील प्रचंड पाऊस सुरू असून येथे काही पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ आजपासून पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली आहे. (kokan rain update raigad fort closed for tourists from today heavy rain in all three districts of konkan)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड किल्ल्यावर काल (7 जुलै) दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. ज्यानंतर संध्याकाळच्या सुमारास येथील महादरवाज्यातून पाण्याचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले. ज्यामुळे किल्ल्यावर अनेक पर्यटक हे अडकून पडले. त्यानंतर आता या सगळ्या पर्यटकांना प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून. यापुढील काही दिवस रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याची माहिती कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा>> Mumbai Local Train Update : कर्जत, कसारा लोकल रेल्वेबद्दल मोठी अपडेट

आदिती तटकरेंनी ट्विटरवरून दिली माहिती..           

'रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज रोजीपासून रायगड किल्ला पर्यटक तसेच शिवभक्त यांच्याकरिता बंद  करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस  बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवेने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून रोपवेने किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.' अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिली.

 

रत्नागिरी जिल्ह्यातही तुफान पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येथील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. तसेच चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर या भागांमध्ये देखील नद्यांना पूर आला होता. त्याचप्रमाणे राजापूर शहरांमध्ये बाजारपेठ ही पाण्याखाली गेली आहे. 

प्रत्येक दुकानांमध्ये जवळजवळ तीन ते चार फूट पाणी होतं त्यानंतर मध्यरात्रीनंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतलेला नंतर नदीच्या पाण्यामध्ये घट होऊ लागले बाजारपेठेत शिरलेले पाणी ओसरू लागले आणि आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावरती येत आहे.

हे ही वाचा>> Mumbai rains : नवरा-बायको बाहेर पडले अन् पाण्यात अडकली कार

त्यामुळे राजापूर बाजारपेठेतील व्यापारी हे आता पुन्हा आपल्या दुकानांची साफसफाई करताना दिसत आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील विस्कळीत झालेला जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असताना दिसून येत आहे. 

सिंधुदुर्गात पावसाचं थैमान

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अधिक झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील एकूण पाच नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहणाऱ्या तिलारी, तेरेखोल, कर्ली, गड नदी, वागोटेन नदी या पाचही नद्या तु़डुंब भरून वाहत आहेत. यामध्ये सकाळी आलेल्या अपडेटनुसार तेरेखोल नदीने धोक्याची पातळी 6.260 होती. प्रत्यक्षात ही पातळी 6.300 एवढ्यावर गेली आहे. तर कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील इशारा पातळी 9.910 होती ती 10.000 वर गेली असून कर्ली नदीने इशारा पातळी गाठली आहे. सध्या पाऊस हा थोडा ओसरला असला तरी नद्यांमधील पाण्याची पातळी मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे कुडाळ येथील माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडल्याने हा मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

    follow whatsapp