Laxman Hake Criticize Manoj Jarange patil : ‘आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज कराव लागेल आणि आरक्षण रद्द झाल्यास आम्ही जबाबदार नसणार’ असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील ओबीसी नेते देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगेंना (Manoj Jarange patil) थेट कोर्टात भेटू असा इशारा दिला आहे. ‘जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ जाऊ दे…असे आव्हानच हाके यांनी जरांगे यांना दिले आहे. (laxman hake direct challenge to manoj jarange patil maratha reservation cm eknath shinde obc leader)
ADVERTISEMENT
लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे म्हणतात आमच्या आरक्षणाला विरोध कराल, तर आम्ही ओबीसींचे आरक्षण कोर्टात चँलेंज करू, तुमचे आरक्षण घालवू. म्हणजे तुला गोरगरीब मराठा समाजाचं पडलेले नाही आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर केला आहे. तुला पडलंय ओबीसी भटक्या,विमुक्त जाती जमातीच्या, सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या ज्यांचे हक्क अधिकार आणि मानवता डावलली गेली, त्या माणसाला आमच्या संविधानाने सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेले आहे. जे आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधीत्वाची भाषा या संविधानामध्ये बोलली आहे. ती तुला संपवायची आहे.म्हणजे आधुनिक काळात तुला या ओबीसी आरक्षणाला विरोध करायचा आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर केला आहे.
हे ही वाचा : Shiv sena : राऊतांचा भाजपसह शिंदे गटावर गंभीर आरोप, ‘खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी…’
दरम्यान एका बाजूला ओबीसीतून आरक्षण मागायचं, दुसऱ्या बाजुला ओबीसींनाच चँलेंज करायची भाषा करायची. दोन विरोधाभासी वक्तव्ये कशी करतो. तुझी औकातच नाही, अशी टीका हाके यांनी जरांगेवर केली आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातला ओबीसी, विजेएनटी, भटक्या विमुक्त जाती आणि आम्ही तू कोर्टात येच, असे लक्ष्मण हाके जरांगेंना म्हणाले आहेत. तसेच तुम्ही तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन करून घुसखोरी करत असल्याचा आरोप देखील जरांगेवर केला.
मुख्यमंत्र्यांनी संवैधानिक पदावरू राहुन सुद्धा महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचे दायित्व असताना कायद्याचे उल्लंघन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचे उल्लंघन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मनोज जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू. मी संविधानाची, कायद्याची भाषा बोलतोय, या व्यवस्थेत हजारो लोक सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समुह घटकाची आम्ही भाषा बोलतोय, त्यामुळे कोर्टात आपण भेटू, दुध का दुध पाणी पाणी होऊन जाऊ दे, असे थेट आव्हानच लक्ष्मण हाके यांनी जरांगेना केले आहे.
ADVERTISEMENT