Libya Floods : लिबियातील पूर्वीकडील डर्ना शहराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याने गेल्या 24 तासात 1500 पेक्षाही जास्त नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. तर साडे पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 10 हजारपेक्षा जास्त लोकं बेपत्ता आहेत. जोरदार चक्रीवादळ झाल्याने पूर परस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांचा त्यामध्ये बळी गेला आहे. या वादळाचे डॅनियल(Storm Daniel) नाव असून बांधलेली धरणे फुटून लोकांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
धरणं फुटून पाणी शहरात शिरल्यामुळे अनेक लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. फक्त एका डर्ना शहरात पाच हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रथम 2300 लोकांचा बळी गेल्याची शंका होती, मात्र परिस्थिती पाहता साडे पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या विनाशाला भूमध्य सागरात आलेले डॅनियल वादळ कारणीभूत आहे. या वादळामुळे समुद्राला भरती येऊन अनेक शहरात समुद्राचे पाणी घुसले आहे. धरणं, पूल आणि रस्ते उद्धवस्त झाले आहेत. डर्ना शहरातील भयाण परिस्थितीसारखी परिस्थिती कुठेच घडली नसेल असं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.
डॅनियल चक्रीवादळाला मेडिकेन असंही संबोधले जात आहे. विरोधी पक्षाकडूनच सरकार चालवले जात असल्यामुळेच ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. विरोधकांमुळेच पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर आता डेर्नाकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
समुद्र किनाऱ्यावरच डर्ना शहर वसले आहे. या शहराची किमान लोकसंख्या 89 हजार आहे. मात्र आलेल्या चक्रीवादळामुळे डर्ना शहरातील पूल, बंधारे उद्धवस्त झाले आहेत. असंख्य लोकांचा यामध्ये बळी गेल्याने आता अनेक ठिकाणी सामुहिक स्मशानभूमी बनवली जात आहेत.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीजचे लिबियाचे राजदूत तामेर रमदान यांनी सांगितले की, मृत आणि बेपत्ता लोकांची संख्या वाढणार आहे. या चक्रीवादळात दहा हजार पेक्षा जास्त लोकं बेपत्ता असल्याचे संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे. हा सर्व बदलत्या हवामानाचा परिणाम असून याआधी असं वादळ कधीच आले नव्हते असंही तज्ज्ञांनी सांगितले.
ADVERTISEMENT