Maharashtra Board HSC Roll Number, MSBSHSE 12th Result 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 12वीचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज (24 मे) निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (maharashtra board hsc result 2023 Roll number is going to be very important to check 12th result)
ADVERTISEMENT
बारावीचा निकाल हा ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची गरज असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जे रोल नंबर देण्यात आले होते तेच त्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी वापरावे लागणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर mh-hsc.ac.in वरुन देखील आपला रोल नंबर डाऊनलोड करु शकतात.
Maharashtra Board 12th Roll Number: असा डाऊनलोड करा आपला रोल नंबर
1. mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
2. मागितलेली माहिती तिथे भरा.
3. तुमचं पूर्ण नाव टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
4. रोल नंबर स्क्रीनवर येईल. त्यानंतर आपण तो डाउनलोड करु शकता.
ADVERTISEMENT