Maharashtra Weather: मुंबईत ढगाळ वातावरण तर, पुणेकरांना थेट इशारा! पहा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई तक

16 Aug 2024 (अपडेटेड: 16 Aug 2024, 10:01 AM)

Maharashtra Weather Forecast : आज  (16  ऑगस्ट) मुंबईत हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत आज हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील.

point

पुणेकरांना हवामान विभागाचा कोणता इशारा?

point

'या' जिल्ह्यांमध्ये पावासाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Forecast : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. पण ऑगस्ट महिना सुरु होताच राज्यात पावसाने काही भागांत विश्रांती घेतली. सध्या काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज  (16  ऑगस्ट) मुंबईत हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (maharashtra Weather Forecast rain live update news today 16 august 2024 Cloudy weather in Mumbai warning to Pune)

हे वाचलं का?

मुंबईत आज किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, कमाल 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईत उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टही देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे.

हेही वाचा : Manoj Jarange Exclusive : ''विधानसभेत कार्यक्रम...सुपडाच साफ करणार'', जरांगेंनी सांगितला प्लॅन?

पुणेकरांना हवामान विभागाचा कोणता इशारा?

गेल्या दोन-तीन आठवड्यांच्या तुलनेत आज पुण्यातील वातावरण उबदार राहील. रात्रीचे तापमानही जास्त असेल. या अचानक बदललेल्या हवामानामुळे पुणेकरांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच ही परिस्थिती आणखी काही दिवस राहील अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

'या' जिल्ह्यांमध्ये पावासाचा अंदाज काय?

नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह वादळी वारा आणि विजांच्या कडकटाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असून नाशिकमध्ये आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल.


 

    follow whatsapp