Maharashtra Weather: राज्यात आज पावसाचा मूड काय? पाहा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 09:26 AM)

Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय झाला. तर, काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होताना पाहायला मिळत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी

point

राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा अंदाज

Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यातील काही भागांत पुन्हा सक्रिय झाला. तर, काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. अशा स्थितीत आज (14 ऑक्टोबर 2024) तुमच्या शहरात पावसाचा मूड कसा असणार? जाणून घेऊया. (maharashtra weather forecast rainfall yellow alert to these districts october heat IMD report today 14 october 2024)

हे वाचलं का?

राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे दोन्ही वातावरण जाणवत आहेत. अशातच राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

हेही वाचा : Baba Siddiqui : भंगारचा धंदा करायला पुण्यात आले अन्..., सिद्दीकींचे मारेकरी शूटर कसे बनले?

राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा अंदाज

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पावसाला पोषक हवामान असल्याने आज मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यात आज 28 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

हेही वाचा : Horoscope In Marathi : दिवाळीआधीच 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार! उद्योगधंद्यातून मिळेल बक्कळ पैसा

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर हलक्या पावसाची शक्यता आहे. आज पुण्यात 25 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर ओसरला होता, मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, आज देखील पावसाची शक्यता आहे.

    follow whatsapp