Maharashtra Weather: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार! वाचा IMD चा आजचा अंदाज

रोहिणी ठोंबरे

29 Aug 2024 (अपडेटेड: 29 Aug 2024, 05:42 PM)

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

तुमच्या जिल्ह्यात हवामानाचा अंदाज काय?

point

'या' राज्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यादरम्यान, हवामान विभागाने (IMD) आज (29 ऑगस्ट) काही जिल्ह्यांना मुसधार पावसाचा इशारा दिला आहे. (maharashtra Weather update news today IMD alert mumbai pune weather report 29 august 2024 )

हे वाचलं का?

पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहणार असून,अधूनमधून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

हेही वाचा : Shivaji Maharaj: जयदीप आपटेने मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय', कुठे आणि कसा झाला फरार?

तुमच्या जिल्ह्यात हवामानाचा अंदाज काय?

हवामान विभागाने आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. जळगाव, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड  जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Shivaji Maharaj: 'महाराज आम्हाला माफ करा', भाजपचा जाहीर माफीनामा; पण मविआवर...

'या' राज्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी पश्चिम राजस्थान आणि अंदमान निकोबार बेटांवर आणि गुरुवारी पश्चिम राजस्थान, केरळ आणि ओडिशामध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशाचा काही भाग, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळचा बहुतांश भाग आणि सर्व ईशान्येकडील राज्यांसह 22 राज्यांमध्ये बुधवारी 10 राज्यांमध्ये गुरुवारी पावसाबाबत पिवळा इशारा आहे.

    follow whatsapp