Maharashtra: अवकाळी पावसाचा अजून तीन दिवस तडाखा, 'या' शहरांना IMD चा इशारा!

रोहिणी ठोंबरे

13 Apr 2024 (अपडेटेड: 13 Apr 2024, 10:20 AM)

Maharashtra Weather Update : देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा बसायला सुरूवात झाली आहे. एकीकडे उष्णतेने अंगाईची लाही-लाही होत असताना, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbaitak
follow google news

Maharashtra Weather Update : देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा बसायला सुरूवात झाली आहे. एकीकडे उष्णतेने अंगाईची लाही-लाही होत असताना, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Weather Update Three more days of unseasonal rain IMD warns these cities)

हे वाचलं का?

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईसह अनेक ठिकाणी कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 'या' शहरांना IMD चा इशारा! 

विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा येथे वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईकरांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा

राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने ते आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात ओलावा घेऊन येत असल्याने मुंबई आणि किनारी भागातील नागरिकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अरबी आणि हिंदी महासागरात हवेच्या कमी दाबामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, त्यामुळे मुंबई आणि कोकणातील तापमानात वाढ झाली आहे. 

    follow whatsapp