महाराष्ट्र : Monsoon In Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उन्हाच्या चढत्या पाऱ्याने लोकांना नकोसं करून सोडलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे डोळे पावसाकडे टक लावून आहेत. पण, यासर्वात आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सध्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आज (6 जून) तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही ट्वीट करत मान्सूनबद्दल माहिती दिली आहे. तसंच, हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे.
हेही वाचा : मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव?
महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागात येत्या तीन ते चार तासांत विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसंच यावेळी वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा : "मोदींसोबत मैत्रीपेक्षा शत्रुत्व फायद्याचे, कारण...", ठाकरेंचे वर्मावर बाण
4 जून रोजी पाऊस गोव्यात दाखल झाला आहे. त्यामुळे आज तळकोकणात पाऊस दाखल होईल असं म्हटलं जात आहे. तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल. तर 10 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आपला तळ ठोकेल. शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT