Manoj Jarange Patil Live Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीचा पुनर्रुच्चार करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला नवी डेडलाईन दिली. जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाही मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर इशारा दिला.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “अंतरवालीत विराट सभा झाली होती. तिथेच 17 डिसेंबर रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता बैठक सुरू होईल. १२ वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही, तर काय, याबद्दल १२ ते ३ या वेळेत आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, यावर बैठक होणार आहे.”
मराठा आरक्षण टिकणार का? जरांगेंचा सवाल
“मी मागेही सांगितलं होतं की, मराठा आरक्षणाला विरोध नाहीये. पण, ते टिकेल का? मराठ्यांनी ते आरक्षण घेतलं, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि रद्द झालं. आता तेच आरक्षण मराठ्यांना मिळणार असेल, तर आम्ही स्वीकारू. पण, ते एनटी, व्हीजेएनटी सारखं टिकेल का? ते महिना किंवा वर्षभर राहणार आणि कुणीतरी कोर्टात गेल्यावर ते उडवणार. ते आरक्षण टिकेल याची खात्री काय?”, असा उलट सवाल जरांगे यांनी सरकारला केला.
हेही वाचा >> “कटोरा हात मैं लेकर, बाबा के नाम दे”, वडेट्टीवार भुजबळांवर कडाडले
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ते आरक्षण 50 टक्क्यांच्या आत घेऊन त्याचा वेगळा प्रवर्ग तयार करणार का? ते स्पष्ट करावं, आम्ही कुठे नाकारलं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनही याचं आंदोलनामुळे गेली आहे. ओबीसीतून आरक्षणही याच आंदोलनामुळे मिळत आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आणि आम्ही त्यावर ठाम आहोत”, असे सांगत जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरे-PM मोदी आज एकत्र असते, पण राऊतांनी पवारांना सांगितलं”
“आमच्या ज्या नोंदी सापडत आहेत, त्या आधारावर महाराष्ट्रातील मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत कायदा पारित करून सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. विषय संपतो. ते मराठा आरक्षण टिकणार आहे का? असा हाच आमचा प्रश्न आहे. ते कायमस्वरुपी कसं प्रत्यक्ष येऊन सांगावं. ते टिकणार नाहीये. त्यामुळे घेऊन करायचं काय?”, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगे पाटलांची नवी डेडलाईन कोणती?
“उपोषण सोडायला सरकारच्या वतीने संदीपान भुमरे, बच्चू कडू, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे असे सहा जण आले होते. आमची त्यांना आज विनंती आहे की, तुम्ही सांगितलं होतं आणि लिहू घेतलं होतं. जे ठरलं होतं, त्याप्रमाणे सर्व मंत्री महोदयांनी आम्हाला 17 डिसेंबरच्या आत सांगावं की, आपलं जे लेखी ठरलं होतं. त्यानुसार तुम्ही आतापर्यंत काय कार्यवाही केली. नाहीतर 17 डिसेंबरला आम्ही निर्णय घेणार आहोत”, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.
हेही वाचा >> Amol Shinde: ‘पोलिसांना एवढंच म्हणालो, पोरगं मेलंय का तेवढं सांगा…’, अमोलच्या वडिलांची प्रतिक्रिया
“आतापर्यंत त्यांच्यापैकी एकानेही आमच्याशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांची फसवून करत आहात की, काय असं आम्हाला वाटू लागलं आहे. वेळेवर येऊन तुम्ही पुन्हा मागे पुढे करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा शब्द आमच्याकडून पाळला जाणार नाही. आम्ही आंदोलनाचा निर्णय जर घेतला, तर तुमचा आमचा संबंध संपला”, असा इशारा जरांगे पाटलांनी उपोषण सोडवायला गेलेल्या मंत्र्यांना दिला.
ADVERTISEMENT