Majhi Ladki bahin Yojana Application Form Update : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहेत. पण जुलै आणि ऑगस्टचे असे एकत्रित मिळून सरकार 3000 रूपये खात्यात जमा करणार आहे. येत्या 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसै खात्यात येणार आहेत. महिलांचा या योजनेला उत्सफूर्द असा प्रतिसाद मिळत आहे. गाव-खेड्यात महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत. तर काही महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी अजून अर्ज भरले नाहीत त्यांच्यासाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद झाल्याचे बोलले जात आहे. ही माहिती खरी आहे की खोटी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (mukhyamantri majhi ladki bahin yojana application form is really closed what is the truth)
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. आतापर्यंत महिलांनी 'नारी शक्ति दूत' या ॲपमधून योजनेसाठी अर्ज केले. परंतु, अॅपद्वारे अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता सरकारने www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. नारी शक्ति दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना “NO NEW FORM ACCEPTED “ अश्या प्रकारचे एरर येत आहे आणि फॉर्म सबमिट होत नाही आहेत. ही समस्या अनेकांना येत आहे.
हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या आमदाराचा राजकीय संन्यास, वारसदारही ठरला!
यामुळे तुम्ही अर्ज करण्यासाठी सकाळी लवकर 4-5 वाजता किंवा रात्री उशिरा प्रयत्न करू शकता. अर्ज भरणे बंद झालेले नाही आहेत. महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. यासाठी अनेक महिलांनी ऑनलाइन पद्धतीने नारी शक्ति दूत ॲपद्वारे अर्ज केले आहेत. परंतु सर्व्हर स्लो सारख्या अडचणी येत होत्या. त्यामुळे फॉर्म भरता येत नव्हते. तर आता फॉर्म भरण्यासाठी सरकारने www. ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. हे पोर्टल 2 दिवसांपूर्वीच राज्य सरकारने चालू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे फॉर्म भरू शकता.
हेही वाचा : Waqf Board Act : वक्फ कायदा काय आहे? मोदी सरकारला कायद्यात काय बदलायचे आहे?
'लाडकी बहीण' योजनेसाठी फक्त 'या' महिलाच पात्र असणार!
राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल. याशिवाय, ज्या महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. त्यांनाच योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ADVERTISEMENT