Ladki Bahin Yojana : ना अर्ज केला, ना कागदपत्रे दिली; तरी लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात कसे पोहोचले?

मुंबई तक

• 11:23 PM • 16 Aug 2024

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : यवतमाळच्या आर्णीत लाडकी बहीण योजना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कारण महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले आहेत.

mukhymantri ladki bahin yojana benefit installment amount sent in brother accout yavatmal story

अर्जही केला नाही, तरी मिळाले भावाला पैसे

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्रात जोरदार चर्चा

point

लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात पोहोचले

point

यवतमाळच्या घटनेेची राज्यात चर्चा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : भास्कर मेहेरे, यवतमाळ : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. या योजनेत लाभार्थी ठरलेल्या महिलांच्या खात्यात हळुहळू पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र यवतमाळमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत (Mukhymantri Ladki Bahin Yojana)  ना कोणताही अर्ज केला, ना कागदपत्रे समबिट केली होती. तरी देखील लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात पोहोचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे. (mukhymantri ladki bahin yojana benefit installment amount sent in brother accout yavatmal story) 

हे वाचलं का?

यवतमाळच्या आर्णीत लाडकी बहीण योजना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कारण महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले आहेत.

 जाफर गफ्फार शेख असे या तरूणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या  बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही चक्रावून गेला आहे. 

हे ही वाचा : Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे

 दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करुन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देखील गेल्या काही दिवसांपासून त्यांची सेतू आणि तहसील कार्यालयात धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाहून अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. त्यात जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसाच एक मेसेज मला सुद्धा आला आहे. माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे. बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे. मी हे खातं 2012 ला उघडलं होतं. पंरतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या कारणाने मी व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर मी यवतमाळला आलो असल्याचे जाफर शेखने म्हटले आहे. 

जाफर पुढे म्हणाले,  इथे आल्यानंतर मी खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी करावी लागेल असं सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना सांगून मी स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मी कोणताही अर्ज केलेला नाही तरी पैसे माझ्या खात्यात कसे जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आली आहे,असे देखील जाफरने म्हटले आहे. 

    follow whatsapp