Narayan Rane Tweet viral Anandibai Joshi: मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. कधी संसदेतील त्यांच्या भाषणामुळे, कधी खासदारांच्या प्रश्नाला अचूक उत्तर न दिल्यामुळे तर कधी पत्रकाराचे काही प्रश्न तात्काळ न समजल्यामुळे.. या अशा गोष्टींमुळे नारायण राणेंना सतत सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे. अशातच आता त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवर करण्यात आलेल्या एका टीकेमुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. (narayan rane tweet goes viral by sharing photo of actress bhagyashree milind on twitter instead of first woman doctor anandibai joshi)
ADVERTISEMENT
राणेंचं 'ते' ट्वीट का होतंय Viral?
नारायण राणे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आज (26 फेब्रुवारी) साधारण 12 तासांपूर्वी एक ट्वीट करण्यात आलं. हे ट्वीट भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त करण्यात आलं होतं.
हे ही वाचा>> Narayan Rane: 'लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, पण..' अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेत पत्ता कट झालेल्या राणेंच्या विधानाने खळबळ
मात्र, हे ट्वीट करताना जो फोटो पोस्ट करण्यात आला होता त्यात डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्याऐवजी 'आनंदी गोपाळ' या सिनेमात आनंदीबाईंची भूमिका साकारणारी भाग्यश्री मिलिंद हिचा पोस्ट ट्वीट करण्यात आला आहे.
आनंदीबाई जोशी यांच्या नावावर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा इतिहास आहे. त्यामुळेच त्यांचा संघर्ष हा अनेक मुलींना प्रेरणा देणार आहे. आनंदीबाई जोशींचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त नारायण राणेंच्या ट्वीटर अकाउंटवरून फोटो कार्ड पोस्ट करण्यात आलं.
ज्यामध्ये बॅकग्राऊंडला जे फोटो वापरण्यात आले आहेत ते आनंदीबाईंचे काही जुने आणि मूळ फोटो वापरण्यात आले आहेत. मात्र, जो एक मोठा फोटो वापरण्यात आला आहे तो मात्र, आंनदी गोपाळ या मराठी सिनेमातील अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिचा आहे. त्यामुळेच राणेंचं ते ट्वीट आता व्हायरल होतं.
हे ही वाचा>> Vinayak Raut: 'राणेंचा वापर करायचा आणि कचऱ्याच्या...', राऊतांची बोचरी टीका
Cibil स्कोअर वरून देखील राणे झालेले ट्रोल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे हे एका कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीमध्ये गेले होते. जिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचवेळी त्यांच्या लघु, मध्यम आणि स्क्षूम उद्योग खात्याशी संबंधित बँकांशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांना सिबिल स्कोअरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, तो नेमका प्रश्न काय आहे ते त्यांना तात्काळ कळालं नाही. त्यामुळे त्यांच्या एका सहाय्यकाने त्यांना सिबिल स्कोअरबाबतचा प्रश्न काय आहे हे कानात सांगितलं. त्यानंतर राणेंनी त्याचं उत्तर दिलं.
मात्र, यावरूनच नारायण राणे हे ट्रोल झाले होते. आता पुन्हा एकदा ट्वीटमुळे ते ट्रोलर्सचं टार्गेट झाले आहेत.
ADVERTISEMENT