Nawaz Modi-Singhania News : गेल्या काही दिवसांपासून एका प्रतिष्ठित कुटुंबातील पती-पत्नीतील वाद प्रसिद्धीच्या झोतात आलाय. हा वाद आहे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील. दोघे घटस्फोट घेणार आहे आणि या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. नवाज मोदींनी गौतम सिंघानिया यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवाज यांनी सिंघानिया यांच्या सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या संपत्तीतील 75 टक्के हिस्सा दोन मुली आणि स्वतःला देण्याची मागणी केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
नवाज मोदी-सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यातील कौटुंबिक वाद सध्या चर्चेत आहे. याच वादाला नवं वळणं मिळालं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नवाज मोदी यांनी रेमंडचे मालक आणि त्यांचे पती गौतम सिंघानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवाज मोदी म्हणाल्या की, “गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलीवर हल्ला केला. दोघांनी लाथा, बुक्क्या मारल्या. गौतम सिंघानिया हे मला आणि अल्पवयीन मुलगी निहारिका हिला सुमारे 15 मिनिटे मारहाण केली”, असा दावा त्यांनी केला आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत अचानक हल्ला
नवाज मोदी असा आरोप केला आहे की, “9 सप्टेंबर रोजी गौतम सिंघानियांच्या वाढदिवसाची मुंबईतील घरी पार्टी होती. पार्टीनंतर (10 सप्टेंबर) पहाटे 5 वाजले होते, तेव्हा मी आणि माझ्या दोन मुली आणि त्यांच्या काही मित्रांसह उपस्थित होतो. त्यावेळी सिंघानीयांनी अचानक हल्ला केला. नंतर गौतम सिंघानीया गायब झाले. मी मुलीला ओढत दुसऱ्या खोलीत नेले.”
हे ही वाचा >> 200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार, विराट-रोहितला संघात स्थान मिळणार की नाही?
“माझ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत, हे त्यांना माहीत आहे. तरीही गौतम सिंघानिया यांनी मला अनेकवेळा खोलीत फरफट नेलं. तो हे फक्त माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी करत होता आणि आम्ही एकमेकींना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो”, नवाज यांनी म्हटलं आहे.
नवाज यांनी पुढे सांगितले की, “मी माझी मैत्रीण अनन्या गोएंकाला कॉल केला. तिने सांगितलं की पोलीस आमच्या मदतीला येणार नाही. गौतम सिंघानीयांनी हे सगळं मॅनेज केलं असतं. अनन्या मला म्हणाली की, ती आणि अनंत पोलीस ठाण्यात जातो आणि नंतर तुझ्याकडे येतो.”
नीता अंबानी आणि अनंत अंबानींनी कशी केली मदत?
नवाज मोदी-सिंघानियांनी सांगितले की, “नीता अंबांनी आणि अनंत अंबांनी हे माझ्यासोबत फोनवरून बोलत होते. ते संपूर्ण कुटुंब यात पडलं. गौतमने माझी मुलगी निहारिकाला सांगितलं की, पोलीस आमची मदत करायला येणार नाही. सगळं काही माझ्या मुठीत आहे. त्यामुळे ती खूप घाबरली. पण मी तिला सांगितलं की, आपल्याला मदत मिळत आहे.”
हे ही वाचा >> …अन् बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले ‘सुरक्षारक्षक’! लोणावळ्यातील किस्सा काय?
“पोलिस आमच्या जेके हाऊस घरात येऊ नये म्हणून गौतम प्रयत्न करत होता. तो पोलिसांना आत येऊ देत नव्हता. पण, ते घरात येतील याची अंबानींनी खात्री केली. अंबानींनी सूचना केल्यामुळे गौतम पोलिसांना घरात येण्यापासून रोखू शकला नाही. याबद्दल मी अंबानींचे आभार मानते”, असं नवाज यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.
‘या व्यावसायिकाला सुपरहिरो मानले’
पती गौतम सिंघानिया यांच्यावर आरोप करताना नवाज मोदी पुढे म्हणाल्या की, “गौतमने गेल्या वर्षी निधन झालेले उद्योगपती अतुल्य मफतलाल यांना नेहमीच आपला सुपरहिरो मानले. मफतलाल यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याचाही आरोप होता. अतुल्यने आपल्या पत्नीशी काय केले, खरेदीसाठी जाताना रस्त्यात पत्नी पायल मफतलालवर कसा हल्ला केला. त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर ठेवले होते. त्यांची अवस्था खूपच बिकट केली होती.”
नवाज मोदींच्या आरोपानुसार, “पती गौतमला सिंघानीया हे असा विचार करायचे की, मफतलाल किती भारी माणूस आहे! म्हणजे ‘किती ताकद, सगळ्या गोष्टी मुठीत…!’ हे असे काहीतरी त्याला माझ्यासोबत करायचं होतं, ज्याची मला आधीपासूनच कल्पना होती.”
गौतम सिंघानिया-नवाज मोदी 32 वर्षांनंतर होणार विभक्त
गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्नाच्या 32 वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होत आहेत. दरम्यान, सोमवारी एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले की, अब्जाधीश गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने घटस्फोटाबाबत एक मोठी अट घातली होती. ती म्हणजे मालमत्तेतील 75 टक्के संपत्ती देण्याची मागणी त्यांनी केली होती.
दोघांमधील वाद कसा आला समोर?
गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये सर्व काही ठीक नाहीये, हे काही दिवसांपूर्वी उजेडात आलं. दिवाळीच्या दिवशी मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील रेमंड इस्टेटमध्ये गौतम सिंघानिया यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या दिवशी त्यांची पत्नी नवाज मोदी-सिंघानिया यांना पार्टीत येऊच दिलं गेलं नाही. त्यांना घराच्या गेटवरच रोखण्यात आलं.
त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाज मोदींपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती.
58 वर्षीय गौतम सिंघानिया यांनी 1999 मध्ये सॉलिसिटर नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदींशी लग्न केले होते. 13 नोव्हेंबर रोजी सिंघानिया यांनी घटस्फोटाची घोषणा करताना एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. दोघांनीही वेगवेगळ्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते.
हे ही वाचा >> …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं
गौतम सिंघानियांनी त्यांच्या ट्विटर (आता एक्स) पोस्टमध्ये लिहिले होते की, “यंदाची दिवाळी आमच्यासाठी नेहमीसारखी नाहीये. 32 वर्षे पती-पत्नी म्हणून एकत्र राहिलो, पालक म्हणून वाढलो आणि नेहमी एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. आमच्यातील कमिटमेंट आणि विश्वासपूर्ण नात्याच्या प्रवासात दोन सर्वात सुंदर वळणंही आली.”
घटस्फोटाच्या प्रकरणावर उद्योगपती गौतम सिंघानिया म्हणाले की, “माझ्या दोन लाडक्या मुलींच्या हितासाठी मी माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखू इच्छितो आणि कोणतीही टिप्पणी करण्यापासून दूर राहायचं आहे. माझ्या गोपनीयतेचा आदर करावा”, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT