Promising PR person of the year award: नवी दिल्ली: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) निखिल मुकुंद वाघ (Nikhil Wagh) यांना राजधानी नवी दिल्ली येथे यंदाच्या “प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभात संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार श्री जुआल ओरम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (nikhil wagh public relations officer of goa shipyard limited was honored with promising pr person of the year award in new delhi)
ADVERTISEMENT
यावेळी पर्यटन विभागाचे माजी सचिव श्री विनोद झुत्शी, पीआरसीआयचे मुख्य मार्गदर्शक श्री. जयराम, पीआरसी आयच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुश्री गीता शंकर तसेच मोठ्या संख्येने पीआर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मीडिया व्यावसायिक यांची उपस्थिती होती. याच मान्यवरांच्या उपस्थितीत निखिल वाघ यांना हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
हे ही वाचा >> ‘…अन्यथा मुख्यमंत्री व्हायचं केवळ स्वप्न राहतं’, अजित पवार असं का बोलले?
कोण आहेत निखिल वाघ?
निखिल वाघ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे असून त्यांचे प्रारंभिक शिक्षण सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, येथून त्यांनी आपलं मास कम्युनिकेशनमधील शिक्षण पूर्ण केलं.
हे ही वाचा >> ‘कल्याण लोकसभा भाजपच्या चिन्हावर’, रोहित पवारांनंतर मनसे आमदारांचं मोठं भाकित
निखिल वाघ यांनी 2011 मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) चे PRO- जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी त्यांना लोकमत आणि ABP माझा सारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय माध्यम समूहांमध्ये विविध पदांवर काम केलं. जेथील त्यांना मीडिया क्षेत्रातील 7 वर्षांचा अनुभव आहे. अशाप्रकारे, त्यांच्याकडे एकून 19 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी GSLच्या पीआर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT