Sanjay Gaikwad : शिंदेंच्या वादग्रस्त आमदाराची पोलिसाने धुतली गाडी, 'त्या' व्हिडिओने खळबळ

मुंबई तक

• 06:07 PM • 29 Aug 2024

Police Washing Mla Sanjay Gaikwad Car : बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक पोलीस चारचाकी गाडी धुताना दिसला आहे. सफेद रंगाची ही गाडी आहे. विशेष म्हणजे ही गाडी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची आहे.

 police washing car of mla sanjay gaikwad congress leader harshwardhan sakpal share video social media eknath shinde

बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी हा व्हिडिओ समोर आणला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय गायकवाडांची गाडी पोलिसाने धुतली

point

काँग्रेसच्या माजी आमदाराने शेअर केला व्हिडिओ

point

व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Police Washing Mla Sanjay Gaikwad Car  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसोबत नेत्यांकडून अरेरावी आणि हुज्जत घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आता आमदाराच्या गाड्या पोलीस धुत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ (Harshwardhan Sakpal) यांनी हा व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओनंतर आता पोलीस (Police car Wash) संरक्षणासाठी आहेत की गाड्या धुण्यासाठी आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. (police washing car of mla sanjay gaikwad congress leader harshwardhan sakpal share video social media eknath) shinde 

हे वाचलं का?

बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक पोलीस चारचाकी गाडी धुताना दिसला आहे. सफेद रंगाची ही गाडी आहे. विशेष म्हणजे ही गाडी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची आहे. त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ एक्सवर व्हिडिओ शेअर करून गायकवाड यांना घेरलं आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ, बँकेत 4500 जमा होणार?

''महाराष्ट्र पोलीस शर्म करो !  2 दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते. CM शाळेत पहारा देणार आहेत का ? SP आरोपीच्या घरी बसणार आहेत का? याचे उत्तर आज सकाळी मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार! पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? अशा आशयाचे ट्विट करून सकपाळ यांनी गायकवाडांना घेरलं आहे. 

संजय गायकवाड हे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार आहेत. बुलढाण्याच्या जयस्तंभ कार्यालयात त्यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर पोलीस त्यांची गाडी धूत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सकपाळ यांनी शेअर केला होता. यानंतर पोलीस सरंक्षणासाठी आहेत की गाड्या धुण्यासाठी असा सवाल उपस्थित केला आहे.  

दरम्यान या घटनेनंतर शिंदे गटावर टीका व्हायला सूरूवात झाली आहे. त्यानंतर संजय गायकवाड यांनी समोर येऊन घटनेवर भाष्य केले आहे. तो पोलीस ओकलेला (उलटी केली) होता, म्हणून त्याने गाडी पुसली होती. आता त्याची उलटी त्याने पुसणे ही तर मानवताच. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने गाडी पुसली आणि आमच्याकडे कर्मचारी नाही अशातला काही भाग नाही, असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले आहे. 

    follow whatsapp