Shiv sena-Matoshri : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यावरून राजकारण तापले असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आमदार अपात्रतेच्या निकालानंतर महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मातोश्रीबाहेर (shiv sena matoshree ) घातपाताची शक्यता असल्याचा फोन आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणेतही वाढ करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
‘मातोश्री’ विरोधात संभाषण
महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पोलिसही सतर्क झाले असून सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले. मातोश्रीबाहेरच्या घातपाताविषयीची माहिती सांगताना ते म्हणाले की, मुंबई-गुजरात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने मातोश्रीबाहेर घातपात करणार असल्याचे संभाषण ट्रेनमध्ये ऐकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. अशी चर्चा करणारे तरुण उर्दू भाषेत बोलत होते असंही त्याच्याकडून सांगण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा >> शरद पवारांचा वसुलीचा धंदा, 435 कोटी…, किरीट सोमय्यांनी सांगितलं प्रकरण
राजकारण तापले
आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असल्याने पोलिसांनीही सतर्क होत सुरक्षेत वाढ केली आहे. मात्र तो फोन केली याचा तपासही केला जात आहे. राज्यात सध्या अनेक विषयावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ केली आहे.
घातपातवरून आरोप-प्रत्यारोप
मातोश्रीबाहेर घातपात करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरक्षिते वाढ केल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र त्यावरूनही आता राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी त्यावरूनच त्यांनी संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधल आहे.
शिरसाठांचा राऊतांना टोला
आमदार संजय शिरसाठ यांनी मात्रोश्रीची काळजी तुम्ही करू नका, त्यासाठी राज्य सरकार समर्थ असल्याचे त्यांनी राऊतांना ठणकावून सांगितले आहे. तसेच हा फोन संजय राऊतांच्याच माणसाने केले नसेल का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. आमदार शिरसाठांनी टीका केल्यामुळे यावरून हे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT